ST BUS sakal media
मुंबई

महापुरग्रस्त जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

3 महिन्याचे वेतन आणि महागाई भत्ता बिनव्याजी मिळणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जुलै मध्ये रायगड (raigad), रत्नागिरी (ratnagiri, सिंधुदूर्ग (sindhudurg), कोल्हापूर (kolhapur), सांगली (sangli), सातारा (satara) व पालघर (palghar) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा महापूर आणि दरड कोसळून (landslide) प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये एसटी बाधित एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाकडून दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यांचे बिनव्याजी वेतन आणि 30 दिवसांची खास विशेष रजेसह तातडीने दोन हजार रुपयांची मदत करण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली होती. त्यानंतर महामंडळाने यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. (msrtc employees flood districts will get relief)

पुर, वादळ, भूकंप, आग, वीज कोसळणे आणि अतिवृष्टी इत्यादी आपत्तीत सापडलेल्या एसटी कर्मचा-यांना तातडीने मदत देण्याचे धोरण कामगार करारात ठरले आहे. त्यामुळे यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापूरामुळे सर्वसामान्य जनतेसह एसटी कर्मचाऱ्यांनाही संकटाचा सामना करावा लागला आहे. प्रवासी सेवा देण्याच्या कर्तव्यासह महापुरात आपल्या कुटुंबाला वाचवण्याचे आव्हान सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना पेलावे लागले आहे.

त्यामुळे अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाला आता एसटी महामंडळ धावून आले आहे. राज्य एसटी कामगार संघटनेच्या मागणीनंतर एसटी महामंडळाने बाधित कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता अडवांस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड , सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित कर्मचार्यांनी माहिती मागविण्यात आले आल्याने, महापुरातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणूक : महायुतीचे खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

SCROLL FOR NEXT