st bus 
मुंबई

दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे डबघाईस आलेल्या एसटीला आता डिझेल दरवाढीचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात दरदिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ होत आहे. एसटी महामंडळाने 21 मे रोजी 55.17 रुपयांमध्ये विकत घेतलेले डिझेल आता 1 जूनपासुन 64.48 रुपयाने विकत घ्यावे लागले आहे. त्यामुळे या कालावधीत 9.13 रुपयांची वाढ एसटीला सोसावी लागत असल्याने भविष्यात एसटीची वाट बिकट असल्याचे दिसून येत आहे.

एसटी महांडळाला नियमित एसटीच्या वाहतूकीसाठी दैनंदिन 12 लाख लिटर डिझेल लागले. सध्या सुमारे 1800 गाड्या रस्त्यांवर धावत आहे. त्यातून महामंडळाला दैनंदिन 22 कोटींचे उत्पन्न सुद्धा मिळते. मात्र, सध्या एसटीची प्रवासी सुविधा संपूर्ण बंद आहे. फक्त मुंबई उपनगरांमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू असून, राज्यामध्ये आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यामध्येही डिझेल खर्च जास्त होत असून अनेकवेळा एका प्रवाशाला घेऊनच एसटी प्रवास करतांना दिसून येत आहे.

महामंडळाच्या वार्षिक अर्थसंकल्पात वर्षाला 3 हजार कोटीची फक्त डिझेल खरेदीसाठी तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात दरवर्षी सुमारे 2800 कोटींचा डिझेलवर खर्च होत असल्याने उत्पन्नाच्या तुलनेत जास्तीत जास्त खर्च डिझलेवर होतो. आता लॉकडाऊनमुळे एसटीची सेवा बंद असतांनाही डिझेल दरवाढ झाली. त्यामुळे एसटीला महागडे डिझेल विकत घेऊन अत्यावश्यक सुविधा द्यावी लागत आहे. 

सौरव गांगुलीचे बंगाली खेळाडूंच बक्षिसाच्या रक्कमेपासून वंचित; वाचा सविस्तर...​

तिजोरीत खडखडाट
प्रवासी वाहतूक बंद असल्याने एसटीच्या तिजोरीत खडखडाट आहे. विविध सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाकडे शिल्लक असलेली रक्कम सुद्धा सुमारे 1800 कोटी एसटी महामंडळाला अदा करण्यात आली आहे. फक्त 27 कोटी राज्य सरकारडे शिल्लक असल्याचे दिसून येत असल्याने भविष्यात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. 

एस.टी.महामंडळ फायद्या-तोट्याचा विचार न करता चालणारा शासनाचा अंगिकृत उपक्रम आहे. त्यामुळे डिझलवर कर लावायला नको. डिझलवर एसटीला एकूण वर्षाला 2800 कोटी खर्च येतो. केंद्र शासनाचा अबकारी कर व राज्यशासनाचा मूल्यवर्धित कर माफ केला तर वर्षाला 1200 कोटी वाचतील. त्यामुळे हे दोन्ही कर माफ केले पाहिजेत
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी कॉंग्रेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT