Mukesh Ambani  sakali
मुंबई

Mukesh Ambani : 'या' रेस्टॉरंटमधून दर आठवड्याला मुकेश अंबानी मागवतात फूड, वाचा खासियत

स्वाति स्नॅक्सच्या कस्टमर लिस्ट मध्ये सेलेब्स, क्रिकेटर्स, टिव्ही स्टार, बिझिनेसमॅन सुद्धा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमधून ओळखले जाणारे मुकेश अंबानी कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत असतात. त्यांच्याविषयी वारंवार चर्चेत येणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ते दर आठड्याला एका रेस्टोरंटमधून फूड मागवतात.

आज आपण याच रेस्टॉरंटविषयी जाणून घेणार आहोत. ( Mukesh Ambani Favourite restaurant Mumbai orders food once a week. )

स्वाती स्नॅक्स हे या रेस्टॉरंटचं नाव आहे. सिंगल मदर मीनाक्षी झावेरी यांनी 1963 मध्ये सुरू केले होते. सीईओ टिम कुक जेव्हा अॅपल स्टोर (Apple Store) च्या ओपनिंगसाठी मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी बॉलीवुड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोबत याच स्वाति स्नॅक्समध्ये वडा पाव खाल्ला होता. वडापाव खाणारी त्यांची एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली ज्यामुळे स्वाती स्नॅक्स चर्चेत आलं होतं.

Madhuri Dixi with Tim Cook

मीनाक्षीने नवऱ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर घर चालवण्यासाठी घरगुती स्नॅक्स बनाविणे सुरू केले. ती एक सिंगल मदर होती. घर चालवण्यासाठी काही ना काही करणे गरजेचे असते आणि त्यांना खाण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांनी शेव पुरी, भेल पुरी, रगडा पॅटिस आणि पाणी पुरी सारखे स्नॅक्स बनवून विक्री सुरू ठेवली.

1979 मध्ये मीनाक्षी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी म्हणजेच आशा आणि आनंदने रेस्टॉरंट की सांभाळलं. मुंबई मध्ये त्यांच्या रेस्टॉरंटचे चार आउटलेट्स आहे. ज्यामध्ये दोन ब्रांच अहमदाबाद आणि 1 मुंबई च्या नरीमन पाईंट आणि एक सांताक्रूज मध्ये आहे. मिनाक्षीची मुलगी आशाने रेस्टोरेंटमध्ये काही डिशेस अॅड केली आहेत.

लोकांना त्यांनी बनविलेले स्नॅक्स खूप आवडले. त्यांच्या हातात स्वाद होता.  काही दिवसातच त्यांनी आपले आउटलेट बनविणे सुरू केले. आशियाच्या 50 सर्वात उत्तम रेस्टॉरंट्सच्या लिस्टमध्ये या रेस्टॉरंटचं नाव आहे.

देशातील मोठमोठे लोक त्यांचे कस्टमर आहे. अंबानीचा संपूर्ण कुटूंब मिनाक्षी स्नॅक्सचे फॅन आहे. मुकेश अंबानींना स्वाति स्नॅक्सचं फुड इतकं आवडतं की ते आठवड्यातून एकदा येथून फूड मागवतात.

स्वाती स्नॅक्सचे प्राइम कस्टमर्सच्या लिस्टमध्ये अंबानी कुटूंब, तबला वादक जाकिर हुसेन, लोकप्रिय पेंटर एमएफ हुसेन सारखे मोठे लोक, एवढंच नाही तर स्वाति स्नॅक्सच्या कस्टमर लिस्ट मध्ये सेलेब्स, क्रिकेटर्स, टिव्ही स्टार, बिझिनेसमॅन सुद्धा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT