मुंबई

मोठी बातमी - मुंबईत कोरोना रुग्णांचा गुणाकार सुरू, एकट्या मुंबईत आज सापडलेत 'इतके' रुग्ण

सकाळवृत्तसेवा

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मोठ्या संख्यने कोरोना रुग्ण सापडत असून  आज नव्या 1411 रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा  22,563 वर पोचला आहे. आज 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 800 वर पोचला आहे. आज सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी 428 रुग्ण गेल्या आठवड्याभरातील आहेत.

आज मुंबईतील विविध परिसरात 1411 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या 22,563 झाली आहे. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 983 रुग्ण आज सापडले असून 428 रुग्ण आठवड्याभरापूर्वीचे आहेत.

आज झालेल्या 43 मृत्यूंपैकी 15 मृत्यू हे 6 ते 15 मे दरम्यान झालेले आहेत. तर 32 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी दोघांचे वय 40 च्या खाली होते. 20 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 21 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 800 झाला आहे. 

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण 727 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 20,881 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 600 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 6,116 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

multiplication of corona patients observed in mumbai more than 1400 patients detected positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Accident: यूएईमध्ये भीषण अपघात; मृत्युमुखी पडलेल्या १३ जणांत भारतीयांचाही समावेश

आला रे आला! दोन वर्षांनंतर स्टार खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास तयार; लिलावात नोंदवलं नाव, बेस प्राइज किती?

Shirur Crime News : शिरूरच्या मुंबई बाजारात भरदिवसा घरफोडी; दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख दहा हजारांची रोकड चोरीला

Kaygaon News : ऊस दरावरून पंचायत समिती सदस्य बळीराम खताळ आक्रमक; चेअरमन कृष्णा पा. डोणगावकर यांनी पाठवली एक कोटींची मानहानी नोटीस

Bhau Flex Kadha Portal : फ्लेक्सविरोधात पुणेकर सरसावले! ‘भाऊ फ्लेक्स काढा’ पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

SCROLL FOR NEXT