मुंबई

कोरोना काळात राज्याबाहेरील कॅन्सर ग्रीड सेंटर्सचा कर्करुग्णांना फायदा; अन्य राज्यातील रुग्णांना उपचार मिळणे झाले शक्य

भाग्यश्री भुवड

मुंबई, 12 : कोरोना काळात कर्करुग्णांना राज्याबाहेरील स्थानिक पातळीवर सुरु केलेल्या नॅशनल कॅन्सर ग्रीड सेंटर्सचा फायदा झाला. मुंबईतील परळच्या टाटा रुग्णालयात महाराष्ट्रासह बाहेरील कर्करुग्ण येतात जे कोरोना काळात उपचारांसाठी टाटा रुग्णालयात दाखल होऊ शकले नाहीत. अशा वेळेस उपचार, सल्ला आणि फॉलो अप घेणाऱ्या रुग्णांना नॅशनल कॅन्सर ग्रीड सेंटर्समध्ये वळवण्यात आले. ज्यामुळे, रुग्णांना उपचार मिळणे सोपे होत रुग्णांचा येण्या-जाण्याचा प्रवास वाचल्याचे टाटा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना काळात महाराष्ट्रातील रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचत होते. रुग्णवाहिकेतून किंवा लांबचा पल्ला गाठून रुग्णालयात येत होते. पण, महाराष्ट्राबाहेरील रुग्णांसाठी या ग्रीड सेंटर्सने मोठा हातभार लावला. महाराष्ट्राबाहेर 50 हून अधिक राज्यांमध्ये टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने सुरू केलेले नॅशनल कॅन्सर ग्रीड सेंटर्स आहेत.

एखाद्या रुग्णाला रेडिएशन घ्यायचे आहे पण, तो महाराष्ट्राच्या बाहेरील गावातील  आहे. तर भारतात नॅशनल कॅन्सर ग्रीड अशी एक सोसायटी काही काळापूर्वी स्थापन करण्यात आली. त्यात भारतातील जास्तीत जास्त रुग्णालये, इन्स्टिट्यूटचा समावेश करण्यात आला आहे. त्यातून गेल्या किमान पाच वर्षांपासून एकच उद्दिष्ट्य आहे ते म्हणजे रुग्ण भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यात गेला तर त्याला कर्करोगावरील उपचार टाटा रुग्णालयासारखेच मिळाले पाहिजेत. रुग्णांना या ग्रीड सेंटर्समध्ये अधिकृतरित्या तिथे पाठवले जाते. एका कर्करुग्णाला कर्करोगासाठी किमान 30 ते 40 वेळा रेडिएशन घ्यावे लागते. तर, ते आपल्याच गावाजवळील सेंटरमध्ये रेडिएशन घेऊन टाटा रुग्णालयाला त्याची माहिती दिली जाते. ज्यामुळे, टाटा रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी व्हायला मदत होते आणि रुग्णाला त्याच्या घराजवळच उपचार मिळतात असे टाटा रुग्णालयाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस.एच.जाफरी यांनी सांगितले आहे. 

या ठिकाणी आहेत नॅशनल कॅन्सर ग्रीड -

श्रीनगर, जम्मू, चंदिगढ, शिमला, देहरादून, नवी दिल्ली, रोहताक, बिकानेर, बरेली, जयपूर, लखनऊ, जयपूर, वाराणसी, गुवाहाटी, जोधपूर, ग्वालियर, उदयपूर, अलाहाबाद, पटणा, नहारलगून, शिलाँग, कोहिमा, सिलचर, इम्प्हाल, अहमदाबाद, करामसाड, सतना, अगरतला, रायपूर, कोलकात्ता, एझ्वल, बेटूल, नागपूर, कट्टक, भुबनेश्वर, मुंबई, पुणे, कोल्हापुर, हैदराबाद, विशाखापट्टणम, कर्णुल, तिरुपती, बंगळूरु, कांचीपूरम, चेन्नई, वेल्लूर, पोर्ट ब्लेअर, पुद्दूचेरी, थलासरी, कोची, थिरुवअनंतपूरम, कोयंबतूर या 52 शहरात  238 ठिकाणी  नॅशनल कॅन्सर ग्रीड केंद्रे आहेत.

नॅशनल कॅन्सर ग्रीड केंद्राने राबवलेले उपक्रम - 

कोरोना महामारीदरम्यान नॅशनल कॅन्सर ग्रीडने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. कोविड 19 साठी घेतलेल्या 16 वेबिनारमध्ये 22000 लोकांना समाविष्ट करुन घेतले गेले. साथीचा रोग पसरलेला असताना देखील कर्करोगाच्या आरोग्यास प्राधान्य देण्याच्या धोरणाला प्रोत्साहन दिले. जेणेकरुन कोविड पर्वा न करता कर्करोगाची काळजी चालू राहील. सर्व एनसीजी केंद्रांना कर्करोग शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले. सुरुवातीला मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये उपचार घेतलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी स्थानिक कर्करोग केंद्रांना प्रोत्साहन दिले असे टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डाॅ. सी प्रमेश यांनी सांगितले. 

mumabi news out of state cancer grid centers are beneficial for cancer patients amid corona


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT