Crime News Esakal
मुंबई

Crime News: गर्लफ्रेंडशी भांडण झालं म्हणून पोलिसाने उचललं टोकाचं पाऊल! प्रेयसीला मेसेज अन् फोटो पाठवून....

मुंबईतील वरळीत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर पोलीस शिपायाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील वरळीत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानंतर पोलीस शिपायाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं आहे. प्रेयसीला मेसेज आणि फोटो पाठवून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रजित साळुंखे (वय २७) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. तो एलए विभाग १ मध्ये कार्यरत होता. रविवारी रात्री वरळीच्या जलतरण तलावाजवळील लोखंडी ग्रीलला गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रेयसीसोबत भांडण झाल्यानं त्यानं हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

इंद्रजितचे त्याच्या प्रेयसीसोबत भांडण झालेले होते. त्यानंतर त्यानं तिला दादरला सोडले. तेथून तो वरळीला आला. तेथून त्याने प्रेयसीला आत्महत्या करत असल्याचा मेसेज आणि फोटो पाठवला.

त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं. या घटनेची नोंद वरळी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fire News: पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग; अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, परिसरात धुराचे मोठे लोट

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न

Horoscope : मार्चच्या पहिल्याच आठवड्यात 4 राशींचा गोल्डन टाईम सुरु ! अचानक धनलाभ आणि करिअरमध्ये यश

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

SCROLL FOR NEXT