मुंबई

मुंबईकरांनो, लोकलच्या जलद मार्गावर AC लोकल होणार सुरु ? महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी दिलं उत्तर

कुलदीप घायवट

मुंबई  :  मध्य रेल्वे मार्गावरून कल्याण ते सीएसएमटी एसी लोकल सेवा सुरू केली आहे. मात्र या एसी लोकलला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही एसी लोकल रिकामी धावत आहे.  त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसी लोकलवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया मागितल्या होत्या. ज्यात अनेक प्रवाशांकडून एसी लोकल जलद मार्गावर चालविण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास लवकरच एसी लोकलच्या फेऱ्या वाढतील. तर, कल्याण ते सीएसएमटी एसी लोकल प्रवास जलद मार्गावरून होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या महाव्यस्थापक संजीव मित्तल यांनी दिली.

मुंबई ते कल्याण टॅक्सीने किंवा अन्य पर्यायी मार्गाने प्रवास करणे खर्चिक बाब आहे. यासह इच्छित स्थळी पोहचण्यास जास्त वेळ लागतो. मात्र हाच प्रवास एसी लोकलने केल्यास खर्च आणि वेळेची बचत होते. त्यामुळे प्रवाशांकडून एसी लोकल पसंती मिळेल, असा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाला आहे. 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेची मर्यादा घालून उपनगरीय लोकल प्रवासात मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे एसी लोकलचे प्रवासी संख्या सुद्धा तीन टक्क्यांनी वाढली. त्यामुळे एसी लोकलची प्रवासी संख्या वाढल्यास आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळाल्यास सीएसएमटी-कल्याण दरम्यान जलद मार्गावर एसी लोकल सुरू करणार आहोत. वेळापत्रक बदलण्यास देखील पुढाकार घेतला जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय मित्तल यांनी दिली.

प्रत्येक दिवशी दहा फेऱ्या :
17 डिसेंबर 2020 रोजी मध्य रेल्वेची दुसरी एसी लोकल मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर सुरू आहे.  प्रत्येक दिवशी या एसी लोकलच्या 10  फेर्‍या होतात. पहाटे 5 वाजून 42 मिनिटांनी कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान पहिली एसी लोकल चालविण्यात येत आहेत. रात्री 11 वाजून 25 मिनिटांनी शेवटची सीएसएमटी-कुर्ला एसी लोकल धावत आहे.  

महत्त्वाची बातमी :  म्हाडाची कोकण आणि मुंबई मंडळाची सोडत येणार कधी? जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच नागपूर विभागातून 130 किलोमीटर प्रतितास वेगाने ट्रेन धावणार आहे. इटारसी- नागपूर- बल्लारशा दरम्यान रेल्वे मार्गाची आरडीएसओच्या पथकाकडून नुकतीच पाहणी केली आहे. याचा अहवाल येताच रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत 130 किलोमीटर प्रतितास वेगनाने ट्रेनची ट्रायल घेतली जाणार असल्याची माहिती मित्तल यांनी दिली.

प्रवासीभिमुख सुविधा वाढणार :
मध्य रेल्वे मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, लिफ्ट यांची संख्या वाढणार आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 76 सरकते जिने आहेत. तर, मार्च 2021 पर्यंत 10 सरकते जिने वाढणार आहेत. तर, पुढील वर्षी एकूण 80 सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. सध्या 40 लिफ्ट आहेत. मार्च 2021 पर्यंत 5 लिफ्ट वाढणार आहेत. तर, पुढील वर्षी 50 लिफ्ट बसविण्यात येणार आहेत. यासह सध्या मध्य रेल्वे मार्गावर 78 पादचारी पूल आहेत. तर, पुढील वर्षी वेगवेगळ्या स्थानकावर गर्दीचे विभाजन करण्यासाठी एकूण 15 पादचारी पूल उभारले जाणार आहेत, अशी माहिती मित्तल यांनी दिली.

mumbai ac local train might run on fast track to attract more mumbai local train user

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : घरफोडीच्या गुन्ह्यात अटक, मुद्देमाल जप्त

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT