Mumbai Agra Highway Accident  E Sakal
मुंबई

मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात विचित्र अपघात

दुसरीकडे चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या पिक अप वाहनाने दुभाजक तोडून मालेगावकडून चांदवडकडे येणाऱ्या कारला धडक दिली.

सुशांत जाधव

Mumbai Agra Highway Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात दोन विचित्र अपघात झाले आहेत. या अपघातांमुळे महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद झाला असून वाहतूक पूर्णत: ठप्प झालीये. परिणामी महामार्गावर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने याच दिशेनं जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. मागून धडक बसल्यानंतर ट्रॅक जाग्यावर पलटला. दुसरीकडे चांदवडकडून मालेगावकडे जाणाऱ्या पिक अप वाहनाने दुभाजक तोडून मालेगावकडून चांदवडकडे येणाऱ्या कारला धडक दिली.

घटनास्थळावरील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात पिक अप वाहनाचा चालक आणि कारमधील प्रवासी जखमी झाले असून त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय आणि मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजते.

एकाच वेळी महामार्गावरील दोन्ही बाजूला अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या दिड दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. चांदवड पोलीस आणि सोमा टोलचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT