मुंबई

मुंबई अहमदाबाद तेजस एक्सप्रेस पुन्हा येणार ट्रॅकवर, जाणून घ्या नवीन टाईमटेबल

कुलदीप घायवट

मुंबई, ता. 28 : पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी खासगी तेजस एक्सप्रेस 14 फेब्रुवारी पासून प्रवाशांच्या सेवेत रुजू हाेणार आहे. या गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुरक्षा किट देण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड आणि हॅन्ड ग्लाेव्हज देण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या चार दिवस धावणार आहे.

काेराेनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 19 मार्च 2020 पासुन देशात धावणार्‍या तिन्ही खासगी तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये पुन्हा ट्रेन सुरू केल्या. दुर्गा पुजा, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांच्या मागणीनुसार तेजस एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.

त्यानुसार आयआरसीटीसी (IRCTC ) तेजस एक्सप्रेस चालविण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आली. आता  प्रवाशांच्या सोयीसाठी 14 फेब्रुवारीपासून तेजस एक्सप्रेस सुरू करणार असल्याची माहिती आयआरसीटीसी कडून देण्यात आली.

mumbai ahemdabad tejas express will resume from 14th February after suspension of services

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT