Mumbai - Ahmedabad National Highway:  sakal
मुंबई

Mumbai - Ahmedabad National Highway: मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चिखलमय, दोनचाकी वाहनांना धोका!

Mumbai : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून गाडी चालवणे अवघड होऊन बसले आहे.

सकाळ वृत्तसेवा

संदीप पंडित

National Highway:

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे काँक्रिटीकरण वाहतुकदारांसाठी अवघड जागेवरचे दुखणे ठरले असताना त्यात महामार्गाच्यथा चिखलमय अवस्थेचा मनस्ताप वाहतुकदारांना सोसावा लागत आहे. त्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून गाडी चालवणे अवघड होऊन बसले आहे.

तर दुसऱ्या बाजूला महामार्गालगत सुरू असलेल्या अवैध माती भरावासाठी दुरवरून आणला जाणारा मुरूम गाडीतून खाली महामार्गावर पडतो. त्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात त्या मुरूमाचा चिखल होऊन महामार्ग चिखलमय झाला आहे. वसई पूर्व पट्टीतील महामार्ग मोठ्या प्रमाणात चिखलमय झाला असून दुचाकीस्वारांना या चिखलमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

वसई पूर्वेतील बापाणे, ससुनवघर, ससुपाडा, मालजीपाडा तसेच अन्य लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात माती भराव सुरू आहे. गेल्यावेळेस याच अवैध माती भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न होऊन महामार्गावर पाणी साचले होते. त्यामुळे तब्बल 9 ते 10 दिवस वाहतुकीला फटका बसला होता.

आता पुन्हा तेच उपद्रव भूमाफियांकडून महामार्गावर सुरू आहेत. मात्र पालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.कोरोनानंतर वसईतील बहुतांश चाकरमानी भाईंदर, मिरारोड, बोरीवली याठिकाणी कामाला जातात. त्यामुळे दुचाकीस्वारांना या चिखलमय रस्त्याचा ताप सोसावा लागत आहे.

दुचाकीस्वारांना या अशा चिखलमय रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे वाटू लागले आहे.त्यातच सिमेंट काँक्रिटचे काम अर्धवट राहिल्याने ना नीट रस्ता ना सिमेंटचा रस्ता अशी अवस्था झाल्याने त्याच हि फटका महामार्गावरून प्रवास करणार्यांना बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT