Accident
Accident esakal
मुंबई

Accident : विमानतळ परिसरात भरधाव गाडीची सुरक्षा रक्षकाला धडक; सुरक्षारक्षक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

विमानतळ परिसरात असलेली अनधिकृत पार्किंगच नियोजन करण्यासाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकाला एका चारचाकीने जोरदार धडक दिली.

मुंबई - विमानतळ परिसरात असलेली अनधिकृत पार्किंगच नियोजन करण्यासाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकाला एका चारचाकीने जोरदार धडक दिली. त्यात संबंधित सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली असून, चालकावर सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पिडीत सुरक्षा रक्षकावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तक्रारदार महेंद्र मिस्त्री क्रिस्टल सिक्युरिटी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. संबंधित कंपनी ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये सुरक्षा पुरवण्याचे काम करते. 24 मार्च रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांना नौपाडा परिसरातील लीला गॅलरी प्लॉट येथील सुरक्षा व्यवस्था पाहण्याचे काम सोपवण्यात आले होते.दरम्यान, विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मारुती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग असल्याने ती हटवण्याचे काम ते करत होते. त्याचवेळी एक पांढऱ्या रंगाची इनोवा कार अंधेरी-कुर्ला रोडवरून पार्किंग करण्यासाठी येऊ लागली. ते मिस्त्री यांनी पाहिल्यावर त्यांनी चालकाला पार्किंग न करण्याकरिता हातवारे करत ओरडण्यास सुरुवात केली. मात्र त्याने मिस्त्रींचे काहीच न ऐकता गाडी त्यांच्या दिशेने भरधाव वेगाने नेली आणि त्याची जोरदार धडक त्यांना बसली.

कूपर रुग्णालयात उपचार

या अपघातात मिस्त्री खाली पडले व यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. तेव्हा डॉक्टरने त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निदान केले. उपचारानंतर मिस्त्री यांनी सहार पोलिस ठाणे गाठत सदर वाहन चालकाविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT