Customs officials at Mumbai Airport display 45 exotic animals found hidden in a passenger’s luggage during a smuggling attempt.  esakal
मुंबई

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Customs Officials Seize 45 Live Animals at Mumbai Airport :अनेक प्राण्यांचा झाला होता गुदमरून मृत्यू ; विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनाही पाहून बसला धक्का

Mayur Ratnaparkhe

Mumbai Airport customs Caught wildlife smuggling : मुंबई विमानतळ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी  कस्टम अधिकाऱ्यांनी आज(शनिवारी) तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेतून चक्क 'रॅकून', काळा कोल्हा आणि 'इगुआना'सह ४५ वन्य प्राणी जप्त केले आहेत. हा प्रवासी थाई एअरवेजने मुंबईत पोहोचला होता.

विमानतळावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, पहाटे थाई एअरवेजच्या विमानाने मुंबईत पोहोचताना या प्रवाशाला पकडण्यात आले. बॅगेची झडती घेताना कस्टम विभागाच्या पथकाला प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल ४५ प्राणी सापडले.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्राणी तस्करीद्वारे आणले जात होते. प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेले अनेक प्राणीही गुदमरून मृत्युमुखी पडले होते. या प्राण्यांमध्ये 'रॅकून', 'हायराक्स (जे सशासारखे दिसतात)', काळा कोल्हा आणि 'इगुआना' इत्यादींचा समावेश होता.

याशिवाय अधिकाऱ्याने अशीही माहिती दिली की 'रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर'च्या तज्ञांनी प्राण्यांची काळजी घेण्यात आणि त्यांना स्थिर करण्यात मदत केली, जे वन्यजीव संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जातील.

गेल्या ३५ दिवसांत मुंबई विमानतळावर ३८० प्राण्यांची तस्करीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात शुगर ग्लायडर, पिट व्हायपर आणि हनी बेअर सारख्या १५ वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश आहे. जून २०२५ मध्ये, साप, इगुआना आणि संरक्षित प्रजातींसह २८४ विदेशी प्राण्यांशी संबंधित चार प्रकरणे नोंदवली गेली. सर्व प्राणी जप्त करण्यात आले. तसेच, पाच जणांना अटकही करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT