mumbai Anti-Extortion Cell arrested 4 accused for duping 3 BJP MLAs including Rahul Kul  
मुंबई

मंत्रीपदाचे अमिष दाखवून भाजप आमदारांकडे १०० कोटींची मागणी, चौघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या बदल्यात 100 कोटी रुपयांची मागणी करत दौंड येथील भाजप आमदार राहुल कुल यांच्यासह 3 भाजप आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

या प्रकरणात अटक केलेले रियाझ शेख (41), योगेश कुलकर्णी (57), सागर संगवई (37) आणि जफर अहमद रशीद अहमद उस्मानी (53) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला आरोपी शेख यांने १२ जुलै रोजी भाजप आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र कुल यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानंत त्यांनी कुल यांच्या पीएशी संपर्क केला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला फोन करून सांगितले की, तो मला मंत्रीपद मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. मी लगेच पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांना कळवले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी किती लोकांशी संपर्क साधला याची पोलीस चौकशी करत आहेत, असे भाजप आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival 2025 : डोंबिवलीतील प्रसिद्ध डायमंडच्या राजाचे आगमन थाटात; उभे रिंगणांनी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी...

Sprouts Benefits: दररोज मोड आलेलं धान्य खाणं आरोग्यासाठी लाभदायक; जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे!

Ahilyanagar fraud: 'बनावट नोटांद्वारे फसवणूक; तिघे गजाआड', एक कोटीच्या बनावट नोटा जप्त

Latest Marathi News Updates : अमित साटम मुंबईचे अध्यक्ष होणार, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

Pune News : सिंहगडावर बेपत्ता झालेला तरुण कसा सापडला? चार दिवस अन्न-पाण्याशिवाय कड्यात अडकलेला...

SCROLL FOR NEXT