it program
it program sakal
मुंबई

मुंबई : सोमवारी यंग लीडर अॅस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उदघाटन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा दिलेल्या आणि मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांना एचसीएल या नामांकित कंपनीच्या माध्यमातून आयटीचे प्रशिक्षण आणि शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र यंग लीडर अॅस्पिरेशन डेव्हलपमेंट (एमवायएलएपी) या महत्वाकांशी प्रोग्रामचे सोमवारी, ६ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

यावेळी उपमख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मंत्री उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र यंग लीडर अॅस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी बारावी विज्ञान शाखेतून गणित विषय घेऊन सन २०२१ मध्ये बारावी उत्तीर्ण झालेले आणि ६० टक्के गुण असलेले विद्यार्थी व सन २०२२ या वर्षी विज्ञान शाखेतून गणित विषय घेऊन बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संबंधित जिल्यास्तरावर नोंदणी करण्यात येणार असून ही नोंदणीही ६ जूनपासून WWW.HCLTECHBEE.COM या संकेतस्थळावर करता येणार असल्याची .माहिती मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.

पहिल्या सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर सहा महिने विद्यार्थ्यांना १० हजार रूपयांचे मानधन दिले जाणार आहे. या नंतर यशस्वीरित्या एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना याच कंपनीमध्ये आयटी प्रोफेशनल म्हणून पदवीचे शिक्षण आणि त्यानंतर लाखो रूपयांचे पॅकजसह 100 टक्के नोकरी आणि शिष्यवृत्तीही दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT