मुंबई

Mumbai Breaking: आज पासुन मुंबईचा 'बेस्ट' प्रवास महागला; जाणून घ्या नवीन दर आणि कारण

बस प्रवासाचा दैनंदिन दर ५० वरून ६० रुपये व मासिक पास ७५० वरून ९०० रुपये करण्यात आला आहे |Daily bus fare has been increased from Rs 50 to Rs 60 and monthly pass from Rs 750 to Rs 900.

सकाळ वृत्तसेवा

Best News: बेस्ट प्रशासनाने आपल्या विद्यमान बस पास योजनेत सुधारणा केली. त्यात दैनंदिन आणि मासिक पास दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दैनिक पास १०; तर मासिक पास दरात दीडशे रुपयांची वाढ झाली असून, (ता. १) वाढीव दर लागू होणार आहेत.

सुधारित पास वातानुकूलित तसेच विना-वातानुकूलित बससेवांवर लागू असणार आहेत. सर्वसाधारण तिकीट दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मुंबईत सध्या बेस्टची पास सुविधा घेणारे सुमारे १० लाख ४० हजार ९६५ प्रवासी आहेत.

सुधारित बस पास योजनेनुसार हे बस पास ६, १३, १९ तसेच २५ रुपयांपर्यंतच्या विद्यमान वातानुकूलित व विना-वातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच अमर्याद बस प्रवासाचा दैनंदिन दर ५० वरून ६० रुपये व मासिक पास ७५० वरून ९०० रुपये करण्यात आला आहे.

यात दीडशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. बेस्टची विद्यमान बस पास योजना एप्रिल २०२३ पासून सुरू होती. पूर्वीच्या योजनेत एकूण ४२ प्रकारचे बस पास उपलब्ध होते. ती संख्या आता १८ वर आली असून २४ बस पास योजना कमी करण्यात आल्या आहेत. सर्व बस पास ‘बेस्ट चलो अॅप’ तसेच विविध ‘स्मार्ट कार्ड’च्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ

नागरिकांसाठीच्या मासिक बस पासमधील ५० रुपयांची सवलत कायम ठेवण्यात आली आहे; परंतु साप्ताहिक पासमध्ये कोणतीही सवलत नाही.

यामध्ये कोणतेही बदल नाहीत... -

विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० रुपयांचा मासिक पास उपलब्ध असून, या पासच्या साहाय्याने अमर्याद फेऱ्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. या बस पासमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

- महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गणवेषधारी विद्यार्थी तसेच ४० टक्के व त्याहून अधिक दिव्यांग असलेल्या प्रवाशांच्या मोफत प्रवासाच्या पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

- बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या १०० रुपये आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी असलेल्या ३६५ रुपयांच्या पासमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पासची दरवाढ केल्याने सुट्ट्या पैशांच्या समस्येवर मात होईल. शिवाय दैनंदिन रोखीच्या व्यवहारातील असुरक्षितता टाळता येणार आहे. प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बस योजनेचा लाभ घेण्यास सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने आणि बेस्ट उपक्रमाच्या उत्पन्न वाढीकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

- सुनील वैद्य, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT