BEST Ho-Ho Bus  google
मुंबई

BEST Ho-Ho Bus : फक्त १५० रुपयांत फिरा अख्खी मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून दर एक तासाने पर्यटकांसाठी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत बसेस चालवण्यात येते .

नमिता धुरी

मुंबई : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, बेस्टने 8 ऑगस्टपासून नवीन हॉप ऑन-हॉप ऑफ वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.

या बसेसची दैनंदिन सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सुरू होते आणि तिकिटाची किंमत प्रति व्यक्ती 150 रुपये आहे. (Mumbai BEST Ho-Ho Bus)

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का ?

हो-हो बसेसची वेळ काय आहे ?

बेस्टने दोन महिन्यापूर्वी रविवारी आपला ७५ वा वर्धापन दिन साजरा केला होता. यादरम्यान नवीन हॉप ऑन-हॉप ऑफ (हो-हो) वातानुकूलित बस सेवा म्युझियम, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, रेसकोर्स, धोबी घाट (महालक्ष्मी स्टेशनजवळ) आणि राणीची बाग येथून धावणार असल्याचे सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून दर एक तासाने पर्यटकांसाठी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत बसेस चालवण्यात येत आहेत. या बससाठी पर्यटक शुल्क रु. 150/- प्रति व्यक्ती निश्चित करण्यात आले आहे.

कोणत्याही ठिकाणी उतरून त्याच भाड्यात पुढे जाता येईल

सर्वसामान्यांना मुंबई दाखवण्यासाठी बेस्टने लंडनच्या धरतीवर 'हॉप ऑन-हॉप ऑफ' बससेवा सुरू केली होती. या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ती पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. बेस्टने रविवारी सुरू केलेल्या हो-हो बससेवेचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या पर्यटकाला एखाद्या ठिकाणी उतरून आराम करायचा असेल किंवा वेळ घालवायचा असेल, तर त्याला त्याच भाड्यात दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सोय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT