मुंबई

'अगली बार पथर नही कुछ और होगा',भाजपाच्या हाजी अरफात शेखना धमकी

इनोवा क्रिस्टा कारच्या काचा फोडल्या.

सुरज सावंत

मुंबई: भाजपाचे महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे (transport wing) नेते हाजी अरफात शेख (Haji Arfat Shaikh) यांच्या इनोवा क्रिस्टा कारचे नुकसान करून त्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यांना भाजप (bjp) सोडण्याची धमकी मिळाली आहे. कुर्ला (Kurla) कोर्टाजवळील एलबीएस रोड येथील त्यांच्या घराजवळ गाडी उभी असताना, गाडीच्या काचा दोन अनोळखी व्यक्तींनी फोडल्या. (Mumbai Bjp leader Haji Arfat Shaikh threatened by unknown accused)

तसेच प्लास्टिक पिशवीत एका पेव्हर ब्लाँक आणि धमकीची चिठ्ठी हाजी अरफात शेख यांच्या नावाने लिहिली होती. या चिठ्ठीत "तुझे आखरी चेतावनी दे रहा हू, बीजेपी छोड दे, लोगों को गुमराह करना बंद कर, अगली बार पथर नही कुछ और होगा. बीजेपी छोड...." असे लिहिले होते.

या प्रकरणी हाजी अरफात शेख यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस तपास करत आहेत. हाजी अराफात शेख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेतून झाली. पुढे त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. मनसेमध्ये ते पक्षाचे उपाध्यक्ष आणि वाहतूक शाखेचे प्रमुख होते.

मनसेत मतभेद झाल्यानंतर पुढे २०१४ मध्ये त्यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. शिवसेनेत त्यांना उपनेतेपद आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे अध्यक्षपद मिळाले. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी शिवसेनेला अचानक सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला.

हाजी अरफात शेख म्हणाले...

मला गेल्या काही दिवसात बऱ्याच धमक्या येत आहेत. भाजप मध्ये आल्या पासून पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जातोय. काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गाडी फोडून धमकी दिलीय. मी काम करत राहणार. मी काम करत असल्यामुळे काही लोकांच्या मनात खदखद वाढलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT