Vaacination-Covid19 
मुंबई

मुंबईतील लसीकरण थांबलं! केंद्रांवर नागरिकांची गर्दी अन् संताप

विराज भागवत

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहिमेने वेग घेतला होता. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दिवसागणिक लाखांच्या संख्येने लसीकरण केलं जात होतं. पण गेले काही दिवसांपासून राज्याकडे असलेला लससाठा संपत आल्याचे चित्र होते. त्याचीच प्रचिती आज मुंबईकरांना आली. मुंबईच्या बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर नागरिक लस घेण्यासाठी पोहोचले पण लससाठा उपलब्ध नसल्याने त्यांना नाईलाजाने घरी परतावे लागले. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर अशीच परिस्थिती दिसून आली. लस नव्हती तर आधीच का सांगितलं नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून सध्या विचारण्यात येत आहे.

लससाठा संपुष्टात येण्याबाबत मुंबईच्या महापौर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "नायर हॉस्पिटलध्ये १ दिवसाचा साठा शिल्लक आहे. कस्तुरबा, सायन या हॉस्पिटल्समध्ये साठा संपलाय. केइएम मध्ये १ दिवसाचा साठा आहेत तर माहिम केंद्रावर साठा शिल्लक नाही. अशी सध्याची मुंबईतील परिस्थिती आहे. पुण्याच्या सीरममधून आज १ लाख ७६ हजार लसी मिळणार असं ऐकलंय पण त्यादेखील अपुऱ्याच पडतील. कारण दिवसाला ५०-६० हजार लसीकरण आपण करतोय. त्यामुळे दुसऱ्या डोसवाल्यांना काही काळ वाट पाहावी लागू शकतो", असे पेडणेकर म्हणाल्या.

"सध्या अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर येत आहेत पण लससाठा नसल्याने त्यांचा हिरमोड होताना दिसतोय. अशा परिस्थितीत या नागरिकांना लस आल्यावर पुन्हा बोलावण्यात आलं तर किती लोक रस दाखवतील याबद्दल शंका आहे. प्रसारमाध्यमे दाखवत आहेत की लससाठा नाही, तरीही लोक येत आहेत. केंद्रातून लसी कधी मिळणार माहिती नाही. त्यांचीही काही अडचण असावी. पण सध्या चिंता ही आहे की नागरिक केंद्रावर येऊन लस नाही असं ऐकतायत, ते परतताना कोरोनाचं संकट घेऊन जाऊ नये", असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Impact on Bangladesh: मोदी सरकारने अर्थसंकल्पातून बांगलादेशच्या युनूस सरकारला दिला जबरदस्त दणका!

Latest Marathi News Union Budget 2026: अर्थसंकल्पात फक्त मोठे आकडे आणि पोकळ आश्वासने प्रत्यक्षात जनतेच्या हाती तूरी - हर्षवर्धन सपकाळ

Union budget 2026-27: अर्थसंकल्पात केंद्राचं लाडकं राज्य कोणतं? अनेक महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्प

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT