मुंबई

...म्हणून दोन वेळा तारीख मिळूनही BMC आयुक्तांनी घेतली नव्हती लस

विराज भागवत

मुंबई: देशभरात राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहीमेला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील काही महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. १६ जानेवारीपासून आतापर्यंत लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. लसीकरणाबाबत अपेक्षित जागरूकता न झाल्यामुळे आणि काही गैरसमजुतींमुळे या मोहिमेला मुंबईत अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना सरसकट लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. अशातच, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. तसेच, दारोदारी जाऊन नागरिकांना लस देण्यास प्रशासन तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

"मी आज लसीचा पहिला डोस घेतला. याआधी नोंदणी करून दोन वेळा तारीख मिळाली होती. पण कामा निमित्तबाहेर जावं लागल्यामुळे लस घेता आली नव्हती. पण आज अखेर मी लसीचा पहिला डोस घेतला. आता मी चार आठवड्यानंतर दुसरा डोस घेणार असून मी ठणठणीत आहे", असं चहल यांनी स्पष्ट केलं.

"मुंबईत लसीकरण मोहीम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आपण १६ जानेवारी पासून आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि नंतर फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली. सध्या १० लाखांवर लसीकरण झालं आहे. बीकेसी सेंटर हे देशात सगळ्यात जास्त लसीकरण करणारं केंद्र आहे. तेथे दिवसाला ४० हजारांवर लसीकरण केलं जातं. लवकरच तेथे दिवसाला 1 लाख लोकांना लस देण्याचं लक्ष आहे", अशी योजना त्यांनी मांडली.

"सध्या आम्ही खासगी रुग्णालयाला लसीकरणाची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्राकडे करत आहोत. परवानगी मिळाल्यास १३ हजार अतिरिक्त लसीकरण होऊ शकेल. आता ५९ अतिरिक्त रुग्णालये लसीकरण सुविधा राबवण्यास उत्सुक आहेत. मुंबई परिसरातील मोठ्या रुग्णालयांनी हजार लोकांना आणि छोट्या रूग्णालयांनी ५०० जणांना दिवसात लसीकरण केल्या वेग वाढू शकेल", असे ते म्हणाले.

दारोदारी जाऊन लसीकरण करण्याची तयारी

"दारोदारी जाऊन जनतेला लसीकरण करता यावे याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे. लवकरच त्यावर निर्णय येईल. मग लसीकरणाचा गती येईल. राज्य सरकार याबाबत केंद्राकडे विनंती करणार असून मी स्वतः केंद्राच्या टीमकडे विनंती केली होती. कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. १० फेब्रुवारीला ती सुरू झाली आहे. येत्या १४ दिवसात साखळी सुरू होईल अशी भीती आहे. काही रुग्ण जातील तर काही रूग्ण नवीन येतील. त्यामुळे ८ ते १० हजार खाटा पुरेश्या असतील", असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rain : कोल्हापूर विभागात ओला दुष्काळ! ऊस उत्पादनात ३५ ते ४० लाख टनांची घट होण्याची शक्यता

Satara : महिला डॉक्टर हॉटेलवर का गेली? मध्यरात्री दीड वाजता 'चेक इन', २ दिवसाचं बूकिंग; दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला

Latest Marathi News Live Update : फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

Panvel News: मोलाचा जीव संकटात! कळंबोली, कामोठेतील ४० सोसायट्यांना नोटिसा, अग्निशमन यंत्रणा बंद; नेमकं प्रकरण काय?

Turntable Ladder : ‘टर्नटेबल लॅडर’ म्हणजे काय? कागल उरुसात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी कोल्हापूर अग्निशमन दलाची शौर्यपूर्ण मोहीम

SCROLL FOR NEXT