Genes 
मुंबई

BMC ला 'जिनोम मॅपिंग'वरुन तिसऱ्या लाटेची कळणार वेळ

मॅनेजमेंट संस्थांबरोबर चर्चा

दीनानाथ परब

मुंबई: कोरोनाची तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते, त्याचा शोध घेण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) विज्ञानाचा 'जिनोम मॅपिंग'चा आधार (Genome mapping) घेणार आहे. "या महिनाअखेरीस आमची स्वत:ची जिनोमीक प्रयोगशाळा तयार होईल. या आधीच्या कोविड ट्रेंडचा अभ्यास करुन, एका अंदाजापर्यंत पोहोचण्यासाठी आमची मॅनेजमेंट संस्थांबरोबर चर्चा सुरु आहे" असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. (Mumbai bmc Genome mapping analytics to help ward off third wave)

बी (भेंडी बाजार), सी (गिरगाव), एल(कुर्ला) आणि एम (मानखुर्द गोवंडी पूर्व) या चार वॉडर्सची विश्लेषणासाठी निवड करण्यात आली आहे. कारण महामारीच्याकाळात या चार वॉडर्समध्ये प्रतिलाख तीन हजारपेक्षा कमी कोविड केसेस आढळून आल्या आहेत. सातरस्त्याच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये महापालिकेची जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभी राहत आहे.

कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांमधून लवकरात लवकर नवीन वेरीयंट, म्युटंट शोधणं हे जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे जलदगतीने आरोग्य उपायोजना करता येतील. कोरोना व्हायरसच्या म्युटंटमध्ये परिवर्तन होत असते. दुसऱ्या लाटेचा फटका या म्युटंटमुळेच बसल्याची शक्यता आहे. तिसरी लाट रोखण्यामध्ये या जिनोम प्रयोगशाळा खूप उपयुक्त ठरू शकते.

एल(कुर्ला) वॉर्डला मुख्यालयाकडून प्रश्नसंच मिळाला आहे आणि त्यांनी डाटा गोळा करण्याचे कामही सुरु केलय. "हा दाट लोकवस्तीचा भाग असून इथे झोपडपट्टया आहेत. कुरेशी नगर, जरीमरी, संघर्ष नगर इथे मोठी लोकवस्ती आहे" असे वॉर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी सांगितले. कोविडमधुन बरे झालेल्या आणि ज्यांना कोविडची बाधा झालेली नाही, अशा लोकांकडून डाटा गोळा करायला सुरुवात केली आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी आणि प्रवासाविषयी माहिती गोळा केली जातेय. त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचाही अभ्यास केला जातोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT