Light
Light esakal
मुंबई

Mumbai:विजेच्या धक्क्याने 12 वर्षीय मुलगा जखमी;कल्याण मधील घटना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - सार्वजनिक शौचालयाच्या टेरेसला लागून असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या वायरचा झटका बसल्याने 12 वर्षीय मुलगा गंभीररित्या भाजल्याची घटना कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात घडली आहे. सोनू राम असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाचे देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने मेघनाथ राम यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबासह शौचालयाच्या टेरेसवर रहाण्यास होते.

शौचालयाला लागून विजेचा ट्रान्सफॉर्मर असून त्याची वायर ही शौचालयाच्या टेरेसला लागून आहेत. रविवारी दुपारी मेघनाथ यांचा मुलगा सोनू हा टेरेसवर खेळत होता. यावेळी त्याला विजेच्या वायरचा जोरात झटका बसला.

या दुर्घटनेत तो गंभीर भाजला आहे. त्याला उपचारासाठी प्रथम केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ट्रान्सफार्मरला लागूनच पालिकेने शौचालय उभारले आहे. सोनू याच्या अपघातानंतर भविष्यातही अशा दुर्घटना येथे घडू शकतात. त्यामुळे पालिकेने अशा ठिकाणी शौचालय उभारलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

Badshah: बादशाहसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर पाकिस्तानी अभिनेत्रीनं सोडलं मौन; म्हणाली, "जर मी लग्न केलं असतं तर..."

IPL 2024 Final: KKR च्या विजयावर प्रसिद्ध रॅपरने लावला इतका मोठा सट्टा! SRH जिंकले तर होईल तगडं नुकसान

SCROLL FOR NEXT