mumbai fireing  sakal
मुंबई

Mumbai Breaking: विरार मध्ये पूर्ववैमनस्यातून घरावर फायरिंग; आरोपी फरार

विजय गायकवाड

Mumbai Crime: विरार मध्ये पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीच्या घरावर गोळीबार करून आरोपी फरार झाले आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. विरार पूर्व गोपचार पाडा आशियाना बिल्डिंग , मधील मोबिन शेख यांच्या रूमवर आज सोमवार ता 15 रोजी पहाटे साडे तीन च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत भादवी कलम 307 सह अर्म्स ऍक्ट प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र तीन पथक रवाना झाले असल्याची माहिती विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

मस्तान उस्मान शेख असे संशयित आरोपीचे नाव आहे. विरार पूर्व गोपचार पाडा येथील राहणारे मोबिन शेख यांच्या सोबत आरोपीचा जुना वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सोमवार ता 15 रोजी पहाटे साडे तीन च्या सुमारास आरोपी हा मोबिन शेख यांच्या इमारतीत जाऊन, त्याने प्रथम मदत पाहिजे असल्याचे करण पुढे करून दाराची कडी वाजविली. पण घरातील व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी दार काढले नाही.

लगेच पोलिसांना फोन करून सांगितले. तोपर्यंत आरोपीने घराच्या खिडकीवर एक गोळी फायर करून आरोपी हा फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाला भेट देऊन, त्याचा पंचनामा करून, विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा सराईत असून या आगोदर ही त्याच्याव अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेच्या स्वतंत्र 3 टीम रवाना झाल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT