Mumbai esakal
मुंबई

Mumbai : लाच प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांवर सीबीआयची कारवाई

सर्व रेल्वे अधिकारी हे रेल्वेच्या स्टोअर्स विभागात कार्यरत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी मुंबईत कार्यरत रेल्वे अधिकाऱ्याना अटक केली आहे. या कारवाईत पश्चिम रेल्वेचे दोन अधिकारी आणि मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यासह एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदारांकडून लाच घेताना आरोपी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, सर्व रेल्वे अधिकारी हे रेल्वेच्या स्टोअर्स विभागात कार्यरत आहेत.

या अटकेनंतर 12 ठिकाणी सीबीआयकडून शोध मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई, कोलकाता, ग्रेटर नोएडा, जमशेदपूर, अहमदाबाद आणि वडोदरा येथील आरोपींची निवासस्थाने आणि कार्यालयांचा समावेश आहे. या कारवाईत रोख रक्कम, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे (स्टोअर डिपार्टमेंट) डेप्युटी चीफ मटेरियल मॅनेजर एच नारायणन यांना मुंबई मुख्यालयातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबत समीर देव आणि दीपक जैन या दोन खासगी कंत्राटदारांनाही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही कंत्राटदार मेसर्स अर्नेस्ट इवाटा मदरसन प्रायव्हेट लिमिटेड, ग्रेटर नोएडा येथील कंपनीशी संबंधित आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या ज्या दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यात मटेरिअल मॅनेजमेंट विभागाचे अतुल शर्मा आणि एच.डी परमार यांचा समावेश आहे. हे दोन्ही अधिकाऱ्यांनी खासगी कंत्राटदारांकडून 70500 रुपयांची लाच घेत असल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT