Mumbai News 
मुंबई

Mumbai : मध्य रेल्वेचा देशी जुगाड! एसी लोकलच्या तडे गेलेल्या काचांना चिकट टेपने चिकटवले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईकरांचा सुरक्षित गारेगार प्रवास करता यावा,यासाठी एसी लोकल सुरु झाल्या आहे. मात्र,वातानुकूलित लोकलमुळे साध्या लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत असल्याने संपलेल्या प्रवाशांकडून वारंवार दगडफेकीच्या घटना घडतात. त्यामुळे लोकलच्या डब्याच्या काचांना तडे गेले आहे. हा काचा बदलणे आवश्यक असतानाही मध्ये रेल्वेने तडे गेलेल्या जागी चिकट टेप लावल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

मध्य रेल्वेवर सध्या दिवसाला सहा एसी लोकल गाड्यांचा ५६ फेऱ्या चालविण्यात येतात. या फेऱ्या सीएसएमटी-ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा दरम्यान धावतात. सध्या या लोकलमधून दररोज ५० हजारपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वेने ५ मे २०२२ रोजीपासून एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केली.

त्यानंतर एसी लोकलची प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र, या एसी लोकलमुळे सर्वसामान्य प्रवाशांचा लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. अनेकजण अरामदायी आणि सुरक्षित प्रवास म्हणून एसी लोकलला पसंती देत आहेत. मात्र, ज्या एसी लोकलच्या काचांना तडे गेले आहे.

त्या बदलणे आवश्यक असताना रेल्वेकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. काच बदलण्याऐवजी त्या ठिकाणी चिकटे टेप लावून काम चालवले जात आहे. मध्य रेल्वेचा तात्पुरती मलमपट्टी करून रेल्वे प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

IPL 2026 Final, RCB vs GT live: वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज, नाबाद अर्धशतक झळकावून वाढवली गतविजेत्यांची डोकेदुखी

नेपाळनेही भारतीय जमीन बळकावली, पंतप्रधान बालेन शाह यांचे मोठे विधान, लिपुलेख-कालापानी वाद पुन्हा चर्चेत!

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णय? पाटीदार अम्पायरकडे धावला, विराट संतापला... वॉशिंग्टनला परत बोलवल्याने राडा

SCROLL FOR NEXT