मुंबई

मध्य रेल्वेमार्गावरुन मुंबई-चेन्नई सेंट्रल उत्सव विशेष ट्रेन धावणार

प्रशांत कांबळे

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावरून मुंबई ते चेन्नई दरम्यान उत्सव विशेष ट्रेनच्या 48 फे-या सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने तशी घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळी निमित्त या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या ट्रेन मध्ये एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान  आणि 6 द्वितीय आसन श्रेणी राहणार आहे. तर 02163 उत्सव विशेष एक्सप्रेसच्या विशेष  शुल्कासह 5 नोव्हेंबर पासून तिकीट बुकिंग सर्व  संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होणार आहे. दरम्यान केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल, त्यासोबतच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 च्या संबंधित सर्व निकषांचे पालन करने अनिवार्य राहणार आहे.

हे असतील थांबे

  • ठाणे, कल्याण, पुणे, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, यादगीर, सैदापूर, रायचूर, मंत्रालय रोड, अडोनी, गुंटकल, गुटी, ताडीपत्री, येरगुंटाला, कडप्पा, राजमपेटा, रेनीगुंटा, अरकोणम आणि पेरांबूर (केवळ 02163 साठी)
  • 01263 उत्सव विशेष ट्रेन 7  ते 30 नोव्हेंबर (24 फे-या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज संध्याकाळी 6.45 वाजता सुटेल आणि  चेन्नई सेंट्रलला दुसर्‍या दिवशी दुपारी 4.20  वाजता पोहोचेल.
  • 02164 उत्सव विशेष एक्सप्रेस 8 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर  (24 फे-या)  चेन्नई सेंट्रल येथून दररोज संध्याकाळी 6.15  वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी दुपारी 4 वाजता पोहोचेल.

----------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Chennai Central Utsav special train will run from Central Railway

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT