अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या sakal
मुंबई

Mumbai : पावसाच्या धारांसह घामाच्या धारांनी नागरिक ओले चिंब

अर्धा तासाच्या पावसाने जमिनीत काहीसा ओलावा निर्माण झाल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे नागरिक सुखावले.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मंगळवारी सकाळी 10 च्या आसपास मात्र आभाळ भरुन आले आणि अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. अर्धा तासाच्या पावसाने जमिनीत काहीसा ओलावा निर्माण झाल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे नागरिक सुखावले.

त्यानंतर मात्र पडलेल्या कडक उन्हाने पुन्हा एकदा सारेच हैराण झाले आहेत. त्यामुळे पावसाच्या धारांत चिंब भिजल्यानंतर क्षणात पडणाऱ्या उन्हाने घामांच्या धारांतही भिजण्याचा अनुभव मंगळवारी नागरिकांनी घेतला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने कामावर निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी 9 वाजल्यापासून आकाशात ढगाळ वातावरण होते. जोरदार पाऊस पडणार नाही अशा विचारात असतानाच अचानक पाऊस आल्याने कामावर निघालेल्या नागरिकांची, दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. दुकानदार दुकाने लावण्याच्या गडबडीत होते, कामगार कामावर जाण्याच्या गडबडीत असताना पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्याने पावसात नागरिक भिजले.

अनेकांनी रिक्षा करुन स्टेशन गाठणे पसंत केले तर काहींनी इमारती, दुकानाचा आडोसा घेत काही वेळ काढला. सुट्टीचा आनंद घेणारी लहान मुलांनी या पावसात भिजण्याची मज्जा लुटली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या इच्छित स्थळी जाण्याची लगबग सुरु केली. अवघ्या काही मिनीटांच्या या पावसाने सखल भागातील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना काहीसा त्रास सहन करावा लागला.

पावसाने उघडीप दिल्यानंतर क्षणात कडक ऊन शहरात पडले. आणि या उन्हाच्या झळांनी नागरिक घामाघुम झाले. पाऊस येऊन गेल्याने आणखीनच उकाडा जाणवू लागला असून एकाच वेळी पावसात आणि घामाच्या धारांत भिजण्याचा अनुभव कल्याण डोंबिवलीकरांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Students Scholarship: ST विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणाची सुवर्णसंधी! राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीचा अर्ज कसा करायचा जाणून घ्या

उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार! महाराष्ट्र विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक सादर; हे नेमके काय आहे अन् तरतुदी कोणत्या?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी थोड्याच वेळात घेणार पंतप्रधान मोदींची भेट

VIDEO : 'देव कोणत्या रूपात भेटेल, सांगता येत नाही…'; मंदिराबाहेर बसलेला कुत्रा देतोय 'आशीर्वाद', पाहा मनाला भिडणारा व्हिडिओ

Lyari Town Real Story : कामगारांची घरं कशी बनली माफियांचा अड्डा? 'धुरंदर' चित्रपटातल्या 'Lyari Town'ची खरी गोष्ट...

SCROLL FOR NEXT