मुंबई

मुंबईतील नद्यांमध्ये पुन्हा जलसृष्टी बहरणार; नद्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास होणार

समीर सुर्वे

मुंबई : नद्यांचे पर्यटन केंद्र होण्याचा मार्गातील प्रमुख अडथळा दुर झाला आहे. मुंबईतील नद्याच्या शुध्दीकरणासाठी महानगर पालिकेने मागवलेल्या निवीदांना एक ते दिड वर्षांनी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील नद्यांमध्ये पुन्हा जलसृष्टी बहरण्याची शक्‍यता आहे. नदीत येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाल्यास नदीची वहन क्षमता वाढून त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोकाही कमी होऊ शकतो. यासाठी महानगर पालिकेने 1400 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज केला आहे.

मुंबईच्या नद्या मध्ये येणाऱ्या सांडपाण्यामुळे त्या गटारगंगा झाल्या आहेत. पुराचा धोका टाका टाळण्यासाठी नद्याच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता त्या पुढे जाऊन या नद्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास करण्याचा महानगर पालिका प्रयत्न करत आहे. यासाठी नद्यांमध्ये येणारे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करुन शुध्द करुन ते पुन्हा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महानगर पालिका गेल्या एक ते दिड वर्षापासून निवीदा मागवत होती.
दहिसर पोईसर ओशिवरा या तीन नद्यांसाठी महानगर पालिकेने निवीदा मागवल्या होत्या. या निवीदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच निवीदांच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी करुन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. असे अतिरीक्त आयुक्त पी.वेलारसू यांनी सांगितले. प्रत्येक नदीसाठी तीन कंपन्यांनी निवीदा भरल्या आहेत. त्यांची पात्रता ठरवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

नदीमध्ये येणारे सांडपाणी कचरा रोखला गेल्यास नदीची वहन क्षमता वाढणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची नदीची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका कमी होऊ शकतो. असाही पालिकेचा अंदाज आहे.

हे काम होणार

  • - नाल्यांमधून नदीत येणारे सांडपाणी रोखून ते प्रक्रिया केंद्रात आणण्यात येईल. तेथे त्यावर प्रक्रिया करुन शुध्द करुन ते नदीत सोडण्यात येणार.
  • -नदीच्या बाजूने रस्ते बांधण्यात येणार असून त्यावरुन नागरीकांना विना अडथळा फिरता येणार आहे.
  • -नदीच्या परीसराचे सुशोभीकरण होणार.
  • -15 वर्ष बांधा वापरा हस्तांतर करा या तत्वावर हा प्रकल्प आहे.
  • -दहिसर नदीसाठी दोन शुध्दीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

नदीचा भुगोल आणि खर्च

  • - पोयसर नदी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत उगम होऊन 10 किलोमिटर पर्यंतचा प्रवास करुन मार्वे खाडीत मिसळते.या नदीसाठी 751 कोटी रुपये खर्चांचा अंदाज आहे.
  • -दहिसर नदीचाही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम होऊन 12 किलोमिटरचा प्रवास करुन ही नदी मनोरी खाडीत मिसळते.180 कोटी रुपये खर्चाचा अंदाज.
  • - ओशिवरा नदी आरे वसाहतीत उमग होऊन 7 किलोमिटरचा प्रवास करुन मालाड खाडीत मिसळते.503 कोटी रुपयांचा अंदाज. 

---------------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane ) 

mumbai city news BMC trying to develop the river as a tourist destination live latest update

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT