मुंबई - मुंबईकरांच्या जिभेचे चोचले कमी वेळेत आणि कमी पैशात पुरवणारा वडापाव आता महाग होणार आहे. मध्यमवर्गीय, चाकरमान्यांच्या पोटाला आधार देणाऱ्या वडापावलाही महागाईची तिखट झळ बसली आहे. बाजारात चणा़डाळ महाग झाले आहे. साधारणतः 12 रुपयांना मिळणारा वडापाव 15 ते 18 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. वडापाव सोबतच खमंग भजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईकरांना कोणत्याही वेळी हवाहवासा वाटणारा खमंग आणि गरमागरम जम्बो वडापाव आता 18 रुपयाला मिळणार आहे. राजस्थानी पद्धतीचे वडापाव जसे की, बिकानेर स्वीट, ठक्कर यांनी वडापावची किंमत 20 रुपये केली आहे.
लॉकडाऊन नंतर बाजारात चण्याच्या पिठाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. वडापाव बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वडापाव आता असलेल्या किंमतींमध्ये विकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे वडापावचे दर वाढवण्यात आल्याचे मुंबईतील प्रसिद्ध दुकानदारांनी सांगितले आहे. वडापावच्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली असली तरी, मागणी कमी झालेली नाही. दिवाळी नंतर खाद्यपदार्थांच्या दरांमध्ये झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यांमध्ये मुंबईकरांचा वडापाव महागल्याने चाकरमानी आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडाला महागाईचा चटका बसणार आहे.
mumbai city news wadapav prices will rise in mumbai due to inflation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.