मुंबई

नाले सफाई लटकणार, विलंबाने निवीदा काढण्याचा फटका

समीर सुर्वे

मुंबई: लहान नाले, पर्जन्य पेटिकांच्या सफाईसाठी महानगर पालिकेने जानेवारी महिन्यात निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे यंदाही नाले सफाई विलंबाने सुरु होण्याची शक्यता असून पावसाळा सुरु होईपर्यंत नाले सफाई सुरुच राहण्याची शक्यता आहे.

पावसाच्या तोंडावर दरवर्षी नाले सफाई केली जाते. मात्र ही नाले सफाई नेहमीच वादात सापडायची. विलंबाने होणाऱ्या नालेसफाईमुळे नेहमीच पालिका प्रशासनाला लक्ष केले जाते. त्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या. मात्र यंदा जानेवारी महिन्यात निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नाले सफाई कधी सुरु होणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

28 जानेवारी पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरु होण्यास किमान 1 ते दिड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदा पावसाच्या तोंडावर नाले सफाई सुरु राहणार आहे.

पश्‍चिम मुंबईतील काही लहान नाल्यासाठी वर्षभरात कंत्राटदार न मिळाल्यास महानगर पालिकेनं गेल्या वर्षीच्याच कंत्राटदारांना कामे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने अंदाजित दरापेक्षा 5 ते 22 टक्के खर्च जास्त करणार आहे. नाले सफाईच्या सुमारे 48 कामांसाठी दरवर्षी निवीदा काढल्या जातात. मुंबईत नाले आणि नद्या मिळून सुमारे 689 किलोमीटरच्या पर्यजन्य वाहिन्यांची सफाई केली जाते.

नाल्यांचा प्रकार -लांबी किलोमीटरमध्ये 
मोठे नाले - 247.84
लहान नाले - 421.36
मिठी नदी - 22.25
पर्जन्य पेटिका - 2 हजार किलोमीटर

सफाई कशाची
लहान नाले,पर्जन्य पेटिका,मोऱ्या,बॉक्स ड्रेन आणि पाईप ड्रेन

 
काय होऊ शकते

निविदा भरण्याची मुदत जानेवारी 27 पर्यंत असल्याने प्रत्यक्ष काम फेब्रुवारी अखेर पर्यंतसुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाले सफाई सुरु असते. यंदा तो पर्यंतही नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. पावसाळ्या पूर्वी 70 टक्के नाले सफाई केली जाते. पावसाळ्यादरम्यान 15 आणि पावसाळ्यानंतर पुन्हा 15 टक्के नाले सफाई केली जाते.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai cleansing drainage Tender submission deadline bmc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT