Eknath Shinde Esakal
मुंबई

Eknath Shinde: आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदेंची स्वच्छता मोहीम

स्वच्छता मोहीमेच्या पाहणी दौऱ्यादरम्यान रस्त्यावर पाणी फवारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत रस्त्यांची सफाई केली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील रस्ते, स्वच्छता, साफसफाई, प्रदूषण या मुद्यांवरून अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी लवकर विकासकामांची पाहणी करताना दिसत आहेत. न्यायालयाने प्रदुषणावर खडे बोल सुनावल्यानंतर सरकारने स्वच्छतेसंबधीच्या अनेक सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार मुंबईमध्ये स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर रविवारी या स्वच्छता मोहिमेची पाहणी करताना दिसत आहेत. आज सकाळी वरळीमध्ये शिंदेंनी स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. रस्त्यावर पाईपने पाणी फवारत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित होते.

तर यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, 'कधी रस्ते धुताना पाहिले होते का? फार पूर्वी रस्ते धुतले जायचे, आता एक दिवसाआड रस्ते धुतले जाणार आहेत. तशी यंत्रणा आपल्याला लावायची आहे. ती यंत्रणा लावण्याचं काम सध्या सुरू आहे, जेणेकरून रस्त्यावरील धूळ, माती निघेल. रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाण्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी रिसायकल केलेले पाणी वापरण्यात येत आहे.'

मुख्यमंत्र्यांनी मुंबई सेंटरच्या बेलासीक रोडचीही यावेळी पाहणी केली. रस्त्याच्या कडेला असलेले फुटपाथ आणि डिव्हायडरच्या रंगरंगोटीचे काम व्यवस्थित करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT