Hemant-Nagrale 
मुंबई

"मी पत्रकारांना विनंती करतो की..."; नव्या पोलीस आयुक्तांची 'स्मार्ट' पत्रकार परिषद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या सचिन वाझे प्रकरणात बुधवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी बुधवारी संध्याकाळी नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत स्वत:बद्दलची माहिती सांगितली तसेच मुंबई पोलिसांसमोर सध्या काय आव्हानं आहेत याचीदेखील माहिती दिली. यावेळी बहुचर्चित मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरणावर हेमंत नगराळे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण नगराळे यांनी पत्रकारांना एक विनंती केली आणि पत्रकारांच्या साऱ्या अपेक्षित प्रश्नांमधील हवाच काढून घेतली.

नवे कमिशनर हेमंत नगराळे हे पत्रकार परिषदेत म्हणाले, "सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की सध्या राज्यात काही प्रकरणांचा तपास सुरू आहे. जेव्हा प्रकरण तपासाच्या प्रक्रियेत असते, त्यावेळी त्यावर बोलणं योग्य नाही. त्यामुळे अशा प्रश्नावर मी भाष्य करून घेणार नाही. तसेच, सचिन वाझे यांच्या प्रकरणात काय काय होऊ शकते? याबद्दलचे अतिशयोक्ती होणारे प्रश्न किंवा जर-तर, किंतु-परंतु करणारे प्रश्न विचारू नयेत. कारण मी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मी मुंबई आयुक्तालयात आधीही काम केलं आहे. पण सध्याच्या गोष्टींबद्दल मी प्रश्नांची उत्तरं आत्ताच देऊ शकणार नाही."

दरम्यान, राज्य सरकारने पोलीस दलात महत्त्वपूर्ण फेरबदल करत परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दूर केलं. रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार, संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी तर परमवीर सिंग यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले.

"मुंबई पोलिसांसाठी सध्या कठीण काळ सुरू आहे. या कठीण काळात राज्य सरकारने माझ्यावर एक जबाबदारी सोपवली आहे. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे, ती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या सुधारणेमध्ये मला कॉन्स्टेबल ते आयुक्तांपर्यंत साऱ्यांचं सहकार्य हवं आहे. त्याचसोबत सर्व जनतेनेही आम्हाला सहकार्य करावं, अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र व मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होणार नाही, यासाठी साऱ्यांच्या सहकार्याने आम्हाला पोलीस दलांत आवश्यक त्या सुधारणा करायच्या आहेत", असा भूमिका नवे कमिशनर हेमंत नगराळे यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT