corona  sakal media
मुंबई

मुंबईत कोरोनाची लाट ओसरतेय, मार्चनंतर सर्वात कमी मृत्यूची नोंद

मिलिंद तांबे

मुंबई   : मुंबईत (Mumbai) आज दिवसभरात केवळ 5 रुग्णांच्या मृत्यूची (Corona death) नोंद झाली. 16 मार्चनंतर (March month) पाहिल्यांदाच एवढ्या कमी मृत्यूंची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा (Mumbai corona deaths) 15 हजार 789 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यांपैकी 2 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 पुरुष तर 1 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते.तर 3 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. ( Mumbai Corona deaths very less after march month- nss91)

आज गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद सोमवारी झाली. त्यात आज काहीशी वाढ झाली असून आज 343 नवीन रुग्ण सापडले.कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,34,761 इतकी झाली आहे.आज 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,11,315 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,377 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.5 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 5,267 हजारांवर आला आहे.

कंटेंटमेंट झोनमध्ये वाढ

मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या दोन ने वाढली असून सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या 5 झाली. सीलबंद इमारतींची संख्या ही थोड्या प्रमाणात वाढली असून सीलबंद इमारतींची संख्या 65 झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,202 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 823 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

80 लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण

मुंबईने 80 लाख कोविड चाचण्यांचा टप्पा पार पार केला असून आतापर्यंत एकूण 80,18,377 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट मध्ये किंचित वाढ झाली असून तो 1.22% इतका झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHT 2025-26: काव्या मारनची परफेक्ट चॉईस! 30 लाखाच्या गोलंदाजाने भल्याभल्यांना नाचवले; IPL 2026 नक्कीच गाजवणार

फॉरेनर बायकोचा हट्ट पडलेला बॉलिवूड अभिनेत्याला महागात; परदेशी स्त्रीसोबतच्या लिव्ह इनने झाला पश्चाताप

Latest Maharashtra News Updates Live: राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, शिवसेनेच्या प्रकाश महाजन यांची टीका

Dharashiv News : इमारत तयार, पण सुविधा अद्याप बंद; येरमाळ्यात शासकीय विश्रामगृह ३ वर्षांपासून लोकार्पणाविना!

Jalgaon Municipal Election : जळगावचा 'पहिला नागरिक' कोण? महापौर आरक्षणाची टांगती तलवार, उमेदवारांच्या काळजाची धडधड वाढली

SCROLL FOR NEXT