मुंबई

मुंबईत कोविडच्या प्रत्येक रुग्णावर ५० हजार रुपये खर्च

समीर सुर्वे

मुंबई: मुंबईत कोविडच्या प्रत्येक रुग्णावर 49 हजारच्या आसपास खर्च केला आहे. महानगर पालिकेने कोविडचे उपचार, प्रतिबंध यासह नव्या यंत्र सामुग्रीच्या खरेदीसाठी 1470 कोटी 95 लाख रुपये खर्च केले आहे. कोविड संबंधित कामांसाठी 161 कोटी 69 लाख खर्च करण्यात आला आहे. असे 1632 कोटी 64 लाख रुपये महानगर पालिकेने कोविडसाठी खर्च केले आहे.

कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेला अकस्मित निधी संपल्याने अतिरिक्त 450 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याची मंजूरी स्थायी समितीने दिली आहे. या प्रस्तावात पालिकेने आतापर्यंत झालेल्या खर्चाचे विश्‍लेषण केले आहे. त्यानुसार सर्वाधिक खर्च हा प्रभागातील नियोजन आणि सेव्हन हिल्स रुग्णालयासाठी तब्बल 453 कोटी 19 लाख रुपये खर्च करण्यात आला. मुंबईत आतापर्यंत 2 लाख 94 हजार पर्यंत कोविडचे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. जी उत्तर प्रभागात महानगर पालिकेने 35 कोटी 26 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. हा प्रभागात झालेला सर्वाधिक खर्च आहे. या प्रभागात धारावीचा समावेश आहे.

मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणा मार्फत कोविडसाठी सर्व प्रकारची खरेदी करण्यात येत होती. या विभागाने 182 कोटी 74 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. जंम्बो कोविड केंद्रातील सर्वाधिक खर्च महानगर पालिकेने बीकेसी कोविड केंद्रावर 44 कोटी 50 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे.
 
कोविड काळात झालेला खर्च

  • कार्यकारी आरोग्य अधिकारी - 115 कोटी 50 लाख
  • जंम्बो कोविड सेंटर - 213 कोटी 08 लाख
  • प्रभाग सेव्हन हिल्स रुग्णालयासह -453 कोटी 11 लाख
  • मुख्य रुग्णालये - 104 कोटी 88 लाख
  • विशेष रुग्णालय --14 कोटी 18 लाख
  • उपनगरीय रुग्णालय - 43 कोटी 95 लाख

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona patient costs rupees 50 thousand per patient

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'ओडिशा स्थापना दिना'निमित्त दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT