corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 416 नव्या रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज कोरोनाच्या नवीन रुग्णांचा (corona new patients) आकडा काहीसा कमी झाला असून आज 416 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज दिवसभरात 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (corona deaths) झाली. मृतांचा एकूण आकडा 15,991 वर पोहोचला आहे.

आज नोंद झालेल्या मृतांपैकी चौघांना ही दिर्घकालीन आजार होते. चार पैकी 3 पुरुष 1 महिला रुग्ण होते. मृतांपैकी 2 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटाच्या दरम्यान होते तर 2 रुग्णांचे वय 60 वयोगटाच्या वर होते. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,45,850 वर पोहोचली आहे. तर दरम्यान, दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढला असून 382 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,23,840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे मुंबईत सध्या 3,561 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान आज 36,546 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.13 टक्के इतका आहे. आतापर्यंत 93,89,842 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1379 दिवस असा आहे.

धारावीत शून्य रुग्णांची नोंद 

धारावीत आज पुन्हा शून्य रुग्णांची नोंद झाली. कोविड काळात 15 वेळा धारावीत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. धारावीतील एकूण रुग्णसंख्या 7,029 इतकी आहे. तर केवळ 13 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 6,607 रुग्ण बरे होऊन घरी गेले. दादर मध्ये आज केवळ 2 नवीन रुग्ण सापडला असून एकूण रुग्णसंख्या 10,055 इतकी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 90 असून आतापर्यंत 9669 रुग्ण बरे झाले आहेत. माहीम मध्ये ही केवळ 8 नवीन रुग्ण सापडला असुन एकूण रुग्णसंख्या 10,392 झाली आहे. 127 सक्रिय रुग्ण असून  10,004 रुग्ण बरे झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT