ICU Bed Sakal media
मुंबई

मुंबईतील कोरोनासाठीचे 91 टक्के बेड्स रिक्त; आयसीयू आणि व्हेंटिलेटरही रिकामे

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड -19 (corona) च्या दुसर्‍या लाटेचा (corona second wave) तडाखा बसल्यानंतर संपूर्ण मुंबईच्या रूग्णालयातील (Mumbai hospital) जवळपास 91 टक्के बेड्स (vacant beds) रिक्त आहेत. तर, जवळपास 70 टक्क्यांहून अधिक आयसीयू बेड्स (ICU beds) रिकामे आहेत. त्यामुळे, ही एक दिलासादायक बाब जरी असली तरी मुंबई पालिका (bmc) तिसऱ्या लाटेची तयारी करत आहे. तिसऱ्या लाटेत (corona third wave) लहान मुलांना सर्वाधिक फटका बसणार असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली असली तरी दुसऱ्या लाटेत नवजात आयसीयू 100 टक्के रिक्त असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवरुन स्पष्ट होत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डच्या 19 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, एकूण 16,198 कोविड बेड्सपैकी 14,519 बेड्स सध्या रिक्त आहेत. तसंच, गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या 2,206 आयसीयू बेड्सपैकी 1,666 खाटा बेड्स आहेत.  विशेष म्हणजे 1,287 व्हेटिंलेटर्सपैकी 903 व्हेंटिलेटर्स रिक्त आहेत म्हणजेच जवळपास 70 ते 80 टक्क्यांहून अधिक व्हेटिलेंटर्सही रिकामे आहेत. गणेशोत्सवानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या ही रुग्णांची नोंद स्थिर असून दररोज चारशे ते पाचशेच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. मात्र, त्यात गंभीर आणि हॉस्पिटलायझेशनची गरज असणारे रुग्ण फार कमी असल्याचे तज्ज्ञ मंडळी सांगतात.

बालरोग आयसीयूही रिक्त

संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे.  दुसऱ्या लाटेत लहान मुलांना झालेल्या संसर्गाचे प्रमाण वाढले असून 28 हजारांहून अधिक लहान मुले संक्रमित झाली आहेत. मात्र, त्यांच्यात गंभीरतेचे प्रमाण कमी असून डॅशबोर्डनुसार बालरोग आयसीयूचा फक्त एकच बेड भरलेला दिसत आहे. पालिकेने दिलेल्या आकेडवारीनुसार संसर्गाचे प्रमाण दुप्पट जरी झाले असले तरी मृत्यूंची आकडेवारीही अगदीच नगण्य आहे. 8, 281ऑक्सिजन बेड्सपैकी 669 भरलेले आहेत आणि 7, 612 रिक्त आहेत. तर, 1,287 व्हेंटिलेटर्स पैकी 384 भरलेले असून 903 रिक्त आहेत. मुंबईत 15 ऑगस्टपासून निर्बंधांवर शिथिलता आली आहे. त्यातच गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून यातून रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.  

नागरिकांनी नियम पाळावेत

5 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मास्क लावणे, सोशल डिस्टस्टिंग पाळणे आणि नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

Latest Marathi News Live Update : ठाणे महापालिकेच्या वाहनचालकाला कारणे दाखवा नोटीस

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

SCROLL FOR NEXT