mumbai corona update in two days 38 corona infection patient record health sakal
मुंबई

Mumbai Corona Update : दोन दिवसांत कोरोना बाधित ३८ रुग्णांची नोंद

चाचण्यांच्या संख्येत वाढ सक्रिय रुग्ण संख्या ८८ वरून १०३

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Corona Update : मुंबईतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, आज आणखी १९ वाढल्याने ३८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत उपचार घेऊन कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ६२ एवढी आहे. त्यामुळे मुंबईत एकीकडे नवीन रुग्ण वाढताना दिसत आहेत तर दुसरीकडे यशस्वी उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या काहीशी अधिक असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे ही बाब मुंबईकरांसाठी काहीशी दिलासादायक आहे.

मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या संसर्ग वाढीला सुरुवात झाली. त्यावेळी तर कोरोनावर उपचार काय करावेत, औषधे कोणती द्यायची याबाबत पुरेशी माहितीही उपलब्ध होत नव्हती. अशा बिकट परिस्थितीत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची एक टास्क फोर्स गठीत करून त्यांच्या सल्ल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविले. मात्र कोरोनाला अद्यापही मुंबईतून हद्दपार करता आलेले नाही.

आजही मुंबईत कमी - अधिक प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. २१ डिसेंबर २०२३ पर्यन्त मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३४ एवढी होती. १००५ चाचण्या करण्यात आल्या होत्या.कालपर्यंत त्यामध्ये आणखीन ८३ नवीन रुग्णांची भर पडून कोरोना रुग्णांची संख्या ११७ वर गेली.

त्यापैकी उपचार घेऊन बरे झालेल्या व डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या २९ होती. त्यामुळे कालपर्यंत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ८८ वर गेली होती. मात्र आज दिवसभरात कोरोना बाधित आणखीन १९ रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे कोरोना बधित रुग्णांची एकूण संख्या १३६ वर गेली आहे. मात्र दिवसभरात उपचार घेऊन ३३ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १०३ आहे. दिवसभरात दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सध्या ४ हजार २१५ पैकी ९ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेने कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत चाचण्यांची संख्या २ हजार ९९७ एवढी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT