मुंबई

कोरोना व्हायरसचा पुन्हा धोका? मुंबईत नव्या रुग्णांचा भडका

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत नव्या रुग्णांचा भडका उडाला असून रविवारी 1360 रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3 लाख 33 हजार 564 झाली आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णवाढीचा दर वाढून 0.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

काल 1,020 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,10,451 रूग्ण बरे होऊन घरी गेले. काल 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,500 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 231 दिवसांवर आला आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.30 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 34 लाख 16 हजार 761 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी  5 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी 3 पुरुष तर 2 महिला रुग्णाचा समावेश होता. मृतांपैकी एकाचे वय 40 ते  60 च्या दरम्यान होते तर 4 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 18 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 190 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 8,534 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 446 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbai corona virus update new fresh cases 1360 record

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT