मुंबई

काळजी घेण्याची गरज, मुंबईत गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा हजारच्या पार 

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत गुरुवारी 1103 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,298,43 झाली आहे. काल 654 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,07,027 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत काल 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11 हजार 487 इतका झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 238 दिवसांवर आला आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.तर कोविड रुग्णवाढीचा दर वाढून 0.29 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 33 लाख 53 हजार 124 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी  4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांपैकी 3 पुरुष तर 2 महिला रुग्णाचा समावेश होता. तर 2 रुग्णांचे वय 40 ते  60 च्या दरम्यान होते तर 3 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 14 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 185 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 8646 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 426 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai corona virus update reports over one thousand new cases five deaths

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT