मुंबई

मुंबईत कोरोना व्हायरसची स्थिती दिलासादायक, शहरात रुग्णवाढीचा दर 0.12 वर

मिलिंद तांबे

मुंबई :  मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 0.12 इतका खाली आला आहे. कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचे दिसते. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रविवारी 483 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3 लाख 08 हजार 969 झाली आहे. काल 244 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2 लाख 90 हजार 913 रूग्ण बरे होऊन घरी गेले. तर काल दिवसभरात 8 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा 11 हजार 351 इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 559 दिवसांवर गेला आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.12 इतका आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 28 लाख 04 हजार 281 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल मृत झालेल्या 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. कालच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 6 पुरुष आणि 2 महिलेचा समावेश आहे. रविवारी मृत झालेल्या सर्व 8 रुग्णांचे वय 60 वर्षावरील होते.

मुंबईत 199 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 2 हजार 086 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 2 हजार 403 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 413 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai corona virus updates Increased morbidity rate has come down

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT