मुंबई

Corona Virus: मुंबईतल्या वाढत्या रुग्णसंख्येत एक दिलासादायक बातमी

भाग्यश्री भुवड

मुंबई: राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण सतत वाढत आहेत. रोज धडकी भरणारी रुग्ण नोंद समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट असल्याप्रमाणे संख्या वाढत असताना मात्र रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने दिलासा मिळत आहे. 1 मार्चपर्यंत 40 टक्के रुग्ण वाढ झाली असून त्या प्रमाणात मृत्यू दर मात्र नसल्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी सांगत आहेत. मागच्या आठवड्यात वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्ण मृत्यू प्रमाण 0.55 टक्क्याहून ही कमी होते असल्याचे राज्य साथरोग सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. 

राज्यात आणि मुंबईत कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून राज्यात एकूण कोरोना रुग्ण 22 लाख 97 हजार 793 एवढी झाली आहे. तर एकूण मृत्यू 52 हजार 811 एवढे आहेत. म्हणजे सध्या राज्यातील मृत्यूदर 2.3 % एवढा आहे. ही टक्केवारी एवढी असली तरी ही पॉईंट टक्क्यांनी सतत कमी होत आहे. जसे जानेवारी महिन्यात ही टक्केवारी 1.7 टक्के तर फेब्रुवारी महिन्यात 0.9 टक्क्यांनी घसरली होती. सध्या रुग्णात लक्षण दिसून येत नाहीत. त्यामुळे संसर्गित झाले तरी रुग्ण घरीच राहून उपचार करण्यास पसंती देत आहेत. मात्र त्या सोबतच जागतिक महामारीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे राज्य आरोग्य अधिकारी खंत व्यक्त करत आहे.

दरम्यान 2021 जानेवारी पासून रुग्ण वाढत असूनही मृत्यू दर मात्र कमी आहे. कोरोना महामारीत मृत्यू दर महत्वाचा मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील राज्यातील मृत्यू दर कमी होत असल्याचे सांगितले, असे राज्य टास्क फोर्स सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus updates Lower mortality compared infected patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT