Corona e-Sakal
मुंबई

मुंबईकरांना दिलासा!! सक्रिय रुग्णांमध्ये 50 टक्क्याने घट

धारावीत २४ तासांत केवळ 9 नवे रुग्ण

विराज भागवत

मुंबई: शहरात दररोज सापडणाऱ्या रुग्णांचा (New Corona Cases) आकडा कमी झाला असून त्यामुळे सक्रिय रुग्णांची (Active Cases) संख्या ही कमी झाली आहे. गेल्या 15 दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा निम्म्यावर आला असल्याचे दिलासादायक (Relaxing) चित्र दिसत आहे. मुंबईतील (Mumbai) रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 37 हजार 656 हजारांवर आला आहे. 1 मे रोजी मुंबईत 59 हजार 318 सक्रिय रुग्ण होते. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यात आता 50 टक्के घट झाली आहे. (Mumbai Coronavirus Updates Active Cases Decreased 50 per cent)

मुंबईत आज 1657 नवीन रुग्ण सापडले तर 2572 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6,85,705 इतकी झाली आहे. आज 62 रुग्ण दगावले. मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.34 टक्क्यांवर आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ही कमी होऊन 199 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. आतापर्यंत 58,51,279 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. मुंबईत आज 2572 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 6,31,982 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

मुंबईत आज दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 138 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 31 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 38 पुरुष तर 24 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 6 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 22 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 34 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

धारावीत 9 तर दादरमध्ये 13 नवे रुग्ण

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत आज 9 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6671 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 13 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9209 झाली आहे. माहीम मध्ये 26 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9451 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 48 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 25,331 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये निवडणूक रद्द; उद्या पुन्हा होणार मतदान, कारण काय?

Petrol and Diesel: खिशाला जबरदस्त फटका बसणार! पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होणार? केंद्र सरकारने दिले स्पष्ट संकेत

Jalna Politics: परतूर-मंठा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन; जालना जिल्ह्यात शोककळा

Mumbai: हेल्मेट घाला अन्यथा जीवावर बेतेल, वाहतूक पोलिसांची कारवाई होऊनही वाहन चालकांचे दुर्लक्ष

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमानी-पर्यटकांचा खोळंबा! इंदापूर-माणगाव पट्ट्यात वाहनांच्या लांब रांगा; सलग सुट्ट्यांमुळे भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT