मुंबई

Mumbai Crime: शिक्षिकेच्या आई-वडिलांसह मित्रांना पाठवले अश्लील मेसेज-फोटो; गुन्हा दाखल

Mumbai Crime: messages and photos to the victim teacher's parents and friends and mumbai police are searching for him

सकाळ वृत्तसेवा

लोअर परेल येथे राहणाऱ्या एका 24 वर्षांच्या शिक्षिकेची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

आरोपीने पिडीत शिक्षिकेच्या आई-वडिलांसह मित्रांना काही अश्‍लील मेसेज आणि फोटो पाठविले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

तक्रारदार महिला एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. 17 जानेवारीला ती नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना तिचा मोबाईल पर्समधून चोरीस गेला होता. 31 जानेवारीला शिक्षिकेच्या आई-वडिलांना एका अज्ञात मोबाईलवरून अश्‍लील मेसेज आले होते.

त्यात तिच्याविषयी आक्षेपार्ह अश्लील मजकूर होता. अशाच प्रकारे काही अश्‍लील मेसेज तिच्या मित्रांनाही पाठविण्यात आले होते. त्यासोबतच तिचे तिच्या मित्रांसोबतचे काही फोटो पाठवण्यात करण्यात आले होते. शिक्षिकेच्या चोरीस गेलेल्या मोबाईलमधील फोटो अज्ञात व्यक्तीने तिच्या आई-वडिलांसह मित्रांना पाठवून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.

हा प्रकार उघडकीस येताच महीलेने ना. म जोशी मार्ग पोलिसां कडे तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: भिवंडी घटनेत जीव वाचवणाऱ्या जवानाचा खड्ड्यांनी घेतला बळी, ठाण्यात मृत्यू

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला! दरवाजे 4 फुटांवर, कोयना नदीत 24 हजार 908 क्युसेक पाणी; कराडसह कृष्णाकाठ सतर्क

Chopdai Devi Yatra : जोतिबा भक्तांसाठी महत्त्वाची बातमी! डोंगरावर 'या' दिवशी आदिमाया चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा; प्रशासनाकडून तयारी सुरू

Latest Marathi News Live Update : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर आघाडीवर; मध्य प्रदेशातील दतियामध्ये अटीतटीची लढत

Friend Bonding Numerology: 'या' ३ जन्मतारखांचे लोक बनतात बेस्ट फ्रेंड! भांडण झाले तरी तुटत नाही मैत्रीचे नाते...

SCROLL FOR NEXT