fraud esakal
मुंबई

Mumbai Crime: बनावट डॉक्टरांच्या टोळीने केली वृद्धाची 50 लाख रुपयांची फसवणूक

सकाळ डिजिटल टीम

बोरीवलीमधील 65 वर्षीय व्यक्तीवर उपचार करण्याच्या निमित्ताने बनावट डॉक्टरांच्या टोळीने 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेने नुकतीच बनावट डॉक्टरांच्या टोळीला अटक केली होती. त्याच टोळीचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसाना संशय आहे. दरम्यान, बनावट डॉक्टरांच्या या टोळीने फसवणूक केलेले आणखी 2 तक्रारदारांची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.

पोलिसांची कारवाई

बोरीवली येथील 63 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बनावट डॉक्टरांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी राहुल बजाज, डॉक्टर पटेल व त्यांचा सहाय्यक इम्रान यांच्याविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकतीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडाळ्यातील एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी बनावट डॉक्टरांच्या टोळीला अटक केली होती. मोहम्मद शेरु शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल , मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ , मोहम्मद आसिफ मोह. निसार व मोहम्मद अशिफ मोह. शरीफ अशी अटक आरोपींची नावे आहेत.

बनावट उपचार

या प्रकरणी वडाळ्यातील पिडीत तक्रारदार राजेश पाटील यांना ट्रेमर या आजारावर खात्रीशीर उपचार करून त्यांना तात्काळ बरे करण्याचे आमीष या टोळीने दाखवले होते. त्यानंतर पाटील यांच्या वडाळा येथील निवासस्थानी येऊन आरोपी पटेल व त्याचे सहाय्यकाने तपासणी केली.

त्यावेळी पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगून, त्यामुळेच पिडीत तक्रारदाराचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपचार करत असल्याचं भासवून त्यांच्याकडून 14.50 लाख रुपये उकळले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT