Mumbai Crime Sakal
मुंबई

Mumbai Crime: उत्तर प्रदेशहून पिस्तूल विक्रीसाठी आलेला आरोपी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News उत्तर प्रदेशमधून मुंबईत शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने घाटकोपर परिसरात अटक केली. (ghatkopar crime )

हसमतअली शेख असे अटक आरोपीचे नाव असून तो गोवंडी परिसरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे हस्तगत केली असून याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.

घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयाजवळ एक व्यक्ती पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उशिरा घाटकोपरच्या राजेवाडी रुग्णालयाच्या आसपास सापळा रचला. दरम्यान पोलिसाना एक संशयित काही संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले.

पोलिसांनी आरोपीची तपासणी केली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे सापडली. तातडीने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी ही बंदुक उत्तर प्रदेशमधून आणल्याची माहिती आरोपी हसमतअलीने चौकशीत पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून शस्त्र पुरवठा करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT