suspect in murder from Indore arrested on Jail Road esakal
मुंबई

Mumbai Crime: रुग्णवाहिका चालकाच्या हत्याप्रकरणात चारही मारेकरी जेरबंद

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai : नेरुळमधील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या गेटवर रविवारी (ता. २६) रात्री झालेल्या रुग्णवाहिका चालकाच्या हत्याप्रकरणात नेरुळ पोलिसांनी चारही मारेकऱ्यांना जेरबंद केले. या आरोपींमध्ये वडील व त्याच्या तीन मुलांचा समावेश असून चौघांनी हॉस्पिटलच्या गेटवर असलेल्या नारळ पाण्याच्या स्टॉलचे नुकसान केले होते.

याची माहिती मृत युवराज सिंह याने नारळपाणी विक्रेत्याला दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून चौघा पिता-पुत्रांनी युवराज सिंह याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमजद रियाज खान (वय ४५), त्याची मुले समीर खान (वय २४), शोएब खान (वय २२) व एक अल्पवयीन मुलगा या चौघांचा समावेश आहे. चौघे पिता-पुत्र मानखुर्द येथील पीएमजीपी कॉलनीत राहण्यास असून अमजद खान हा डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या गेटच्या बाजूला अंडाभुर्जी विक्रीचा स्टॉल लावत होता.

पाच-सहा दिवसांपूर्वी आरोपी अमजद खान याने नारळपाणी व फळविक्री करणाऱ्यांच्या स्टॉलचे नुकसान केले होते. याबाबतचा व्हिडिओ डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका चालवणाऱ्या युवराज सिंह याने काढला होता. तसेच त्याबाबतची माहिती त्याने नारळपाणी व फळ विक्रेत्यांना दिली होती. अमजद खान याला ही बाब समजल्यानंतर त्याने आपल्या मुलांच्या मदतीने युवराज सिंहचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले होते.

चाकून छाती, पोटावर वार करून पलायन

आरोपी अमजद खान याने रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास युवराज सिंह याला दुसऱ्यामार्फत फोन करून डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळ बोलावून घेतले. त्यामुळे युवराज सिंह हा ज्ञानेश्वर नाकाडे याच्या रुग्णवाहिकेमधून हॉस्पिटलच्या गेटवर आला असता आधीपासून त्या ठिकाणी तयारीत बसलेल्या आरोपी अमजद खान व त्याच्या तीन मुलांनी रुग्णवाहिका अडवली.

त्यातून युवराजला बाहेर खेचून त्याला बांबू व हाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघांनी त्याच्या छाती, पोट व मानेवर चाकूने १४ वार करून त्याची हत्या करून पलायन केले. रुग्णवाहिका चालक ज्ञानेश्वर नाकाडे याने पोलिसांना आरोपींचे वर्णन दिले होते.

तसेच एका प्रत्यक्ष साक्षीदाराने अमजद खान व त्याच्या मुलांनी ही हत्या केल्याची माहिती नेरुळ पोलिसांना दिली होती. त्यानुसार तपास चौघा पिता-पुत्रांना अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवार बोलतात, माझं काम बोलतं, १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

Somnath Temple: सोमनाथ मंदिरावर 1000 वर्षांनंतर असा प्रकाश आणि भव्यता पाहिली नाहीत, पाहा पीएम मोदींचा मंत्रजप व्हिडिओ

Pune Municipal Election : प्रचारातील भोंग्यांमुळे कानाला दडे! नागरिकांसह ज्येष्ठांना त्रास; विद्यार्थीही वैतागले

Pandharpur Accident: पंढरपुरातील पुलावरील भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; आठजण गंभीर, वाहने २५ फूट खोली नदीत, नेमकं काय घडलं..

Pune Municipal Election : : आवाज वाढला; रविवार गाजला! पदयात्रा, फेरी, घरभेटींवर उमेदवारांचा भर

SCROLL FOR NEXT