Crime News esakal
मुंबई

Mumbai Crime : डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखावर हल्ला

डोंबिवली पश्चिमेतील गांधी गार्डन परिसरात राजेश पाटील राहतात. सेवानिवृत्त असलेले राजेश पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून काम पाहतात.

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime - डोंबिवली डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पश्चिमेतील भावे सभागृहाजवळ रविवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास 4 अनोळखी इसमांनी हा हल्ला केला. राजेश पाटील असे तक्रारदार शाखा प्रामुखाचे नाव असून याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील गांधी गार्डन परिसरात राजेश पाटील राहतात. सेवानिवृत्त असलेले राजेश पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक शाखाप्रमुख म्हणून काम पाहतात. रविवारी संध्याकाळच्या सुमारास राजेश पाटील हे शाखेत बसलेले असताना त्यांच्या शाखेसमोर वाहनांची गर्दी होती. त्याचवेळी शाखेच्या बाहेर एक 50 वर्षीय अनोळखी इसम रस्त्यावर त्याच्या मोबाईलवर बोलत होता. राजेश पाटील यांनी त्याला रस्त्यावरून गाडी बाजूला घेऊन फोनवर बोल, अशी विनंती केली.

या बोलण्यावर संतापलेल्या सदर इसमाने तू मला विचारणारा कोण ? असा सवाल करत शिवगाळ केली. शिव्या देऊ नका, असे बोलणाऱ्या शाखाप्रमुख राजेश पाटील यांना पुन्हा धमकावत सदर इसमाने त्याच्या साथीदारांना घेऊन येण्याची धमकी दिली. काही वेळाने हा इसम त्याच्या तीन साथीदारांना घेऊन तेथे आला.

या चौघांनी मिळून शाखाप्रमुख राजेश पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे कपडेही फाडून टाकले. या मारहाणीत शाखाप्रमुख राजेश पाटील यांच्या पायाला दुखापत झाली. या चौकडीने तेथून पळ काढल्यानंतर जखमी अवस्थेत शाखाप्रमुख राजेश पाटील यांनी केडीएमसीचे शास्त्रीनगर हॉस्पिटल गाठले. उपचारानंतर त्यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात जाऊन फरार चौकडीच्या विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिस फरार हल्लेखोर चौकडीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT