Mumbai Crime ESAKAL
मुंबई

Mumbai Crime: जीव वाचविण्यासाठी धावाधाव मात्र.. डोंबिवलीत भर रस्त्यात रिक्षाचालकाची हत्या CCTV Video

जीव वाचविण्यासाठी तो पळाला, मात्र त्याचा जीव गेला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली, ता. 26 - दोघा मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला, रागाच्या भरात एकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले. जीव वाचवण्यासाठी तो पळाला मात्र मित्राने त्याचा पाठलाग सोडला नाही. भर रस्त्यात तो चाकू घेऊन मित्राच्या मागे धावत होता.

काही अंतर धावल्यानंतर मित्र जमिनीवर कोसळला आणि त्याचा जीव गेला. ही घटना डोंबिवली पूर्वेत टाटा पॉवर परिसरात रविवारी मध्यरात्री घडली आहे. याचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झाले असून रात्रीच्या वेळेस रस्त्यावर वाहनांची गर्दी, नागरिकांची वर्दळ असताना हा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश शीलावंत याची हत्या झाली असून मारेकरी किरण शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू कल्याण रोडला लागून असलेल्या टाटा पॉवर परिसरात शैलेश शीलवंत हा राहण्यास होता. शैलेश रिक्षा चालक म्हणून काम करत असे.आरोपी किरण शिंदे यांच्याशी त्याची ओळख होती.

शनिवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून किरण शैलेशवर संतापला आणि याच वादातून किरणने शैलेशला टाटा पॉवर परिसरात एका इमारतीच्या शेजारी गाठले आणि शैलेशवर चाकूने हल्ला केला.

जीव वाचवण्यासाठी शैलेशने तेथून पळ काढला, त्याच्या पाठोपाठ आरोपी किरण ही पळू लागला. रस्त्यावर वाहनांच्या गर्दीतून वाट काढत शैलेश धावत होता तर त्याच्या पाठी किरण चाकू घेऊन धावत होता.

काही अंतर धावल्यानंतर रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने शैलेश जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला.

घटनेची माहिती मिळताच कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ व डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक सुनिल तारमाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज चेक करत मारेकरी शिंदे याची ओळख पटवत त्याला राहत्या परिसरातून पोलिसांनी अटक केली.

मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे. हत्येचे नेमके कारण काय, किरण याच्यावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का ? याचा पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT