Parambir Singh
Parambir Singh  sakal media
मुंबई

परमबीर सिंग आणि वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, आणखी दोघे फरार

ओमकार वाबळे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. गोरेगाव कथित खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आज त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. गुन्हे शाखा युनिट 11 संबंधित कारवाई करत असून या आरोपपत्रात सचिन वाझेसह आणखी काही नावांचा समावेश करण्यात आलाय. सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणी जबाब नोंदवला होता.

गोरेगाव खंडणी प्रकरणात एकूण आतापर्यंत 6 आरोपी आहेत. परमबीर सिंग, सचिन वाझे, रियाझ भाटी, विनय सिंग, अल्पेश आणि चिंटू हे प्रमुख आरोपी आहेत. 1 हजार 895 पानांच हे दोषारोपपत्र जबाबासहित किला कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणातील दोघे अद्याप फरार आहेत. त्यांच्या नावे अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप करून गायब झालेल्या परमबीर सिंग यांनी अखेर चंदीवाल आयोगासमोर हजेरी लावली. आपल्या जीवाला मुंबईत धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे योग्य वेळी न्यायालयात हजर होईल,असं ते म्हणाले होते.

अखेर त्यांना फरार घोषित करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात वॉरंटही जारी केलं. परमबीरसिंग मुंबईत चांदीवाल आयोगासमोर आल्यानंतर त्यांनी जबाब नोंदवला होता. तसेच वाझे आणि त्यांच्यात झालेल्या भेटीमुळे आणखी काँट्रोव्हर्सीचा जन्म झाला. यानंतर सिंग यांच्यावर गृहखात्याने निलंबनाची कारवाई देखील केली.

गृहमंत्रालयाकडून परमबीर सिंग यांचं निलंबन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param bir singh) यांच्यावर अखेर निलंबनाची (suspension) कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी निलंबनाच्या फाईलवर (suspension file) स्वाक्षरी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं होतं. दरम्यान, निलंबनाची फाईल पुढील प्रक्रियेसाठी राज्याच्या गृहविभागाकडे (Home Ministry) पाठवली जाणार असून, निलंबनाचा आदेश राज्याच्या गृह विभागाकडून जारी केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : हायअलर्ट! पुढील 48 तास 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

लढा आता निर्णायक वळणावर; जम्मू-काश्‍मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा

Vidhan Sabha Election : प्रत्येक पक्ष करणार स्वतंत्र सर्वेक्षण ;विधानसभेसाठी ‘मविआ’ची लवकरच बैठक

MSEB Symbiosis Agreement : महावितरण-सिंबायोसिस यांच्यात सामंजस्य करार

T20 World Cup 2024 Super 8 : बांगलादेशची घोडदौड की पराभवाचा धक्का? ड गटामध्ये आज नेपाळशी लढत; नेदरलँड्‌स - श्रीलंकामध्ये लढत

SCROLL FOR NEXT