mumbai crime police marathi news Sakal
मुंबई

Mumbai Crime: बेकायदेशीर बांग्लादेशींना पोलिसांनी केली अटक !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : नवीन पनवेलमधील आदई गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने नुकतीच अटक केली. यात दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

ते सहा महिन्यांपासून आदई गावात वास्तव्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत उघडकीस आले आहे. रूपा शागर सरकार (वय २७), सुमी कोबोर शेख (वय २३), रिदाई रफिक मंडोल (वय २१) व मिनल बरल (वय ४६) अशी त्यांची नावे आहेत.

ओमसाई बिल्डिंगमध्ये मयांक ठाकूर यांच्या घरात बेकायदा राहत होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी या बांगलादेशी नागरिकांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शरद भरगुडे व त्यांच्या पथकाने आदई गावातील ओम साई बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरील संशयीत घरावर छापा मारला.

तेथे हे सर्वजण राहत असल्याचे आढळले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी विना पासपोर्ट वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे कबूल केले. खांदेश्वर पोलिस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम तसेच पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT