मुंबई

Mumbai Crime : अट्टल फरार इराणी दुचाकी चोरट्या ला पोलिसांनी केली अटक

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime : सतत नशेत तरर... नशा केल्यावर तो चोरीसाठी सावज हेरायचा. नव्या कोऱ्या मोटारसायकल चोरून त्या रस्त्यावर भरधाव दामटवायच्या. रस्त्याने पायी चालणाऱ्या प्रवाशांना लक्ष करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र, हातातील मोबाईल चोरून धूम ठोकणाऱ्या सराईत इराणी चोरट्यास महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.

हसन सय्यद (वय 20) असे अटक आरोपीचे नाव असून 10 ते 12 गुन्ह्यातील तो फरार आरोपी आहे.

कल्याण पश्चिम शिवाजी चौक परिसरात एक तरुण मोबाईलवर वडिलांशी बोलत पायी चालत जात होता. यावेळी भरधाव वेगात आलेल्या बाईकस्वाराने 85 हजाराचा तरुणाचा मोबाईल चोरून धूम ठोकली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे यांनी या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उप निरीक्षक तानाजी वाघ, पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी ,मनोहर चित्ते, किशोर सूर्यवंशी पोलीस शिपाई रामेश्वर गामणे ,दीपक थोरात, आनंदा कांगरे , सुजित टिकेकर यांच्या पथकाची नेमणूक केली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चोरटा कैद झाला. यानंतर गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आंबिवली येथे सापळा रचून हसन याला अटक केली.

हसन हा नेहमी नशेत असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली असून तो आधी चांगल्या मोटारसायकल चोरायचा. त्यानंतर रस्त्यावरील प्रवाशांचे मोबाईल, दागिने धूम स्टाईलने बाईक चालवुन चोरायचा.

पोलिसांच्या माहितीनुसार हसन याच्यावर ठाणे, भिवंडी, नवी मुंबई सह इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. दहा ते बारा केस मध्ये हा फरार आहे. सध्या या आरोपीने अजून इतर किती ठिकाणी अशा प्रकारे चोरी केली आहे याचा तपास कल्याण महात्मा फुले पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT